योगेश मिराशी
स्वच्छ भारत अभियानाचा प्रशासनाकडून डंका वाजत असला तरी वेर्ला-काणका पंचायत क्षेत्रात स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहे. साईबाबा मंदिराच्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या या सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यावर कचरा काही बेजबाबदार लोकांकडून टाकला जात आहे.
परिणामी, रस्त्यावर कचऱ्याच्या दुर्गंधीने निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे स्थानिकांच्या आरोग्याच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. वेर्ला-काणका पंचायत क्षेत्रातील काहीजण कचरा रहदारीच्या रस्त्यावर टाकून या परिसर चक्क डंपिंग ग्राउंड बनविल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, पंचायतीने या जागेवर कचरा टाकण्यास मनाई असून उल्लंघनकर्त्यास ५ हजार रुपये दंड द्यावा लागेल, असा सूचना फलक उभारला आहे. तरीही, ही स्थिती अद्याप सुटलेली नाही. हा परिसर म्हापसा पालिका तसेच वेर्ला-काणका पंचायतीच्या सीमेवरील आहे.
हा कचरा रहदारी करणाऱ्यांकडून फेकला जातो. मात्र, नंतर हा कचरा वेळीच पंचायतीकडून उचलला जात नसल्याने या कचऱ्यावर भटकी कुत्री व जनावरे ताव मारतात.
परिणामी, हा कचरा अस्तवस्त पसरतो. याशिवाय, सायंकाळच्या वेळी शाळकरी तसेच महिलावर्ग या रस्त्याचा वापर करतात. अशावेळी ही कुत्री लोकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार अलीकडे घडत आहेत.
या अस्वच्छ कारभाराला प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक यंत्रणेकडून उपाययोजना होत नसल्याने स्थानिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
"काही बेजबाबदार लोक या रस्त्यावर कचरा फेकतात. परिणामी, ही जागा डंपिंग परिसर म्हणून ओळख झालेली आहे. तसेच, कचरा वेळीच उचलला जात नसल्याने स्थानिकांना तसेच ये-जा करणाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो."
"कचऱ्यामुळे हा रस्ता अर्ध्यापेक्षा अधिक व्यापला गेला आहे. त्यामुळे वाहने चालविणे मुश्कील बनले असून, अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही."
- बाळा नाईक, माजी पंचसदस्य.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.