Margao Compactor Dainik Gomantak
गोवा

Margao Compactor: मडगाव नगरपालिकेच्या ‘कॉम्पेक्‍टर’चा पार्ट नादुरुस्त; कचरा उठावावर परिणाम

Margao Garbage cleanup Issue: काही कॉम्पेक्‍टर दहा वर्षांपूर्वी सेवेत दाखल करण्यात आले होते आणि अधून मधून ते अनेकवेळा नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

फातोर्डा: मडगाव नगरपालिकेत कार्यरत असलेले कचरावाहू कॉम्पेक्‍टर नादुरुस्त अवस्थेत आहेत. या ठिकाणी कार्यरत असलेल्या कॉम्पेक्‍टरचा कोणताही पार्ट नादुरुस्त झाल्यास दुसऱ्या कॉम्पेक्‍टरचा काढून त्याला जोडण्यात येतो, असे प्रकार नगरपालिकेत सुरू आहेत.

हे कचरावाहू कॉम्पेक्‍टर अत्यंत जुने झाले आहेत. यातील काही कॉम्पेक्‍टर दहा वर्षांपूर्वी सेवेत दाखल करण्यात आले होते आणि अधून मधून ते अनेकवेळा नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत आहेत. अशाने मडगाव व फातोर्डा परिसरात योग्य पद्धतीने कचरा उचल होत नाही.

कचरा उचल उशिराने होत आहे. त्यामुळे कचरा उचल करणारे कामगार व ड्रायव्हर यांच्यावर अधिक ताण पडत आहे. यामुळे यांच्यात नाराजी पसरत आहे.

चार कॉम्पेक्‍टर; मात्र स्थिती बिकट

या नगरपालिकेत एकंदरीत चार कॉम्पेक्‍टर कार्यरत आहेत. मात्र, त्यांची स्थिती बिकट झाली आहे. याविषयी पालिकेचे मुख्यधिकारी अजित पंचवाडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण नुकताच या पदाचा ताबा घेतल्याने याप्रकरणी कोणतीही माहिती नाही. तरी या प्रकरणात आपण लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. पालिकेच्या काही नगरसेवकांनीही असले प्रकार घडत असल्याचा दुजोरा दिलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

SCROLL FOR NEXT