Margao Municipal Council: मडगाव पालिकेत फाईल मॅनेजमेंटच नाही! जुन्या फाईल्स शोधणे झाले कठीण

Margao: या पालिकेची अनेक प्रकरणे उघडकीस येऊन गलथानपणाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत
Margao: या पालिकेची अनेक प्रकरणे उघडकीस येऊन गलथानपणाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत
Margao Municipal CouncilDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गडबड घोटाळ्यासाठी सुपरिचित असलेल्या मडगाव पालिकेत २०२२ आणि त्यापूर्वीच्या नोंदींचे फाईल मॅनेजमेंट नसल्याने कित्येक फाईल्स कोणाला पाठविण्यात आल्या आहेत अथवा पालिकेच्या कोणत्या विभागात आहेत, हे कळणे कठीण बनले असून त्या शोधून काढणे कटकटीचे काम होत आहे.

मडगाव पालिका आपल्या गलथान कारभारासाठी नेहमीच चर्चेत राहिली आहे. या पालिकेची अनेक प्रकरणे उघडकीस येऊन या पालिकेतील गलथानपणाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. बांधकाम परवाने वा पालिकेने निविदा काढून केलेल्या कामांच्या फाईल्स आढळून येत नसल्याने सामान्य लोकांपासून कंत्राटदारांना याचा फटका बसला आहे.

काहींना बांधकाम परवाने मिळण्यास विलंब झालेला आहे, तर काही कंत्राटदारांची बिले अडकून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

मडगाव पालिका क्षेत्रातील काही प्रभागांत गटार आणि नाल्यांच्या साफसफाईची मान्सूनपूर्व कामे केलेल्या एका कंत्राटदाराच्या दोन फाईल्स कोणत्या विभागात आणि कोणा अधिकारी वा कर्मचाऱ्यांकडे आहेत हे फाईल मॅनेजमेंटमध्ये नोंद नसल्याने या कंत्राटदाराची सुमारे ७ लाख रुपयांची बिले जवळपास दीड वर्ष पडून आहेत. या कंत्राटदाराने प्रत्यक्षात तांत्रिक विभागात या फाईल्सचा शोध घेण्याचा

प्रयत्न केला, तरी त्या सापडत नाहीत. त्या ज्या कनिष्ठ अभियंत्याकडे नोंद असल्याचे शेवटचे फाईल मॅनेजमेंट दाखविते त्या अभियंत्याची बदली झालेली असल्याने अधिकच गोंधळ उडाला आहे. हा गोंधळी कारभार रुळावर आणणे संबंधितांसाठी एक आव्हान बनले आहे.

उपाययोजनांची मागणी

अनेक महत्त्वाच्या फाईल्सची नोंद सापडत नसल्याने व्यक्तिश: शोधाशोध केल्यावर फाईल्स आढळल्यानंतर त्यांना नव्याने क्रमांक देऊन त्यावर आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया झाली आहे, तर काहींवर होत आहे. मात्र, ज्या फाईल्स अजूनपर्यंत सापडलेल्या नाहीत त्याबद्दल पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक उपाय काढण्याची मागणी होत आहे.

Margao: या पालिकेची अनेक प्रकरणे उघडकीस येऊन गलथानपणाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत
Margao Traffic Issue: मडगावात वाहतूक कोंडीमुळे नागरिक हतबल; अजून ५० वाहतूक पोलिसांची मागणी

फाईल्स येथेच असतील!

ज्या फाईल्स पालिकेच्या फाईल मॅनेजमेंटमध्ये नोंद नाहीत आणि त्या वर्षांतील फाईल्स ज्या विभागात आहेत, त्या विभाग प्रमुखांनी त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा नवीन क्रमांक देऊन फाईल मॅनेजमेंटमध्ये नोंद करण्याचे निर्देश देण्याची मागणी होत आहे. कारण फाईल मॅनेजमेंटमध्ये नोंद सापडत नसली, तरी या फाईल्स पालिकेतच असतील. कोणी त्या घरी घेऊन जाऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया एका नगरसेवकाने व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com