Artificial ponds created for Ganpati immersion Dainik Gomantak
गोवा

Bicholim: प्रथमच होणार 'कृत्रिम तळ्या'मध्ये गणपती 'बाप्पा'चे विसर्जन

कृत्रिम तळ्यात गणपतींचे विसर्जन केल्यानंतर आतिल चिकण माती बाहेर काढण्यात येणार आहे. त्यामुळे प्रदूषणाची समस्या होणार नाही.

दैनिक गोमन्तक

डिचोली/तुकाराम सावंत : डिचोली मध्ये अनेक वर्षापासून नदी , नैसर्गिक तलाव (Natural lakes)यामध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात येत होते. परंतु शहरातील गृहनिर्माण वसाहतीत मात्र यंदाच्या वर्षी प्रथमच 'कृत्रिम' तळे गणपती विसर्जनासाठी तयार करण्यात आले आहे. दिड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन प्रथमच या कृत्रिम तलावात करण्यात येणार आहे. एका वेळी जवळपास तीस मूर्ती या तळ्यात विसर्जित करता येऊ शकतील.

नगरसेवक विजयकुमार नाटेकर आणि गणेशभक्तांच्या सहकार्यातून हा कृत्रिम तलाव साकारण्यात आला आहे. या तळ्याच्या उभारणीसाठी एक लाखहून अधिक खर्च करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे हा निधी गणेशभक्तांनीच उभारलेला आहे. गृहनिर्माण वसाहतीतील मोकळ्या जागेत उभारण्यात आलेला हा प्रकल्प सुरवातीस काहीसा वादाचा विषयही बनला होता. त्यानंतर वसाहतीच्या जवळपास साधारण 20 मीटर अंतरावर नवीन जागेत हे कृत्रिम तळे उभारण्यात आले आहे.

संकल्पने मागील कारण :

गृहनिर्माण मंडळाच्या वसाहतीत विविध भागातील नागरिक घरे बांधून ते याठिकाणी कायमचे वास्तव्य करत आहेत. यापैकी काहीजण गणेश चतुर्थीत (Ganesh Chaturthi)निवासस्थानीच गणपतीची पूजा करतात. मागील गेल्या वर्षापर्यंत या गणेशभक्तांकडून येथील परिसरातील एका विहिरीत गणपतींचे विसर्जन करण्यात येत होते. मात्र विहिरीत विसर्जन करताना येणाऱ्या अडचणींमुळे कृत्रिम तळ्याची संकल्पना समोर आली. कृत्रिम तळ्यात गणपतींचे विसर्जन सुरळीतपणे करता येणे शक्य असून, प्रदूषणही निर्माण होणार नाही.

प्रदूषणाचा धोका नाही :

या कृत्रिम तळ्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (Plaster of Paris)मूर्तीचे विसर्जन करण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. कृत्रिम तळ्यात गणपतींचे विसर्जन केल्यानंतर काही दिवसांनी आतिल चिकण माती बाहेर काढण्यात येणार आहे. त्यामुळे प्रदूषणाची समस्या होणार नाही. मोकळ्या जागेत सरकारी प्रकल्प उभारण्याचे झाल्यास उपाययोजना काढण्यात येईल.असे नगरसेवक विजयकुमार नाटेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT