मडगाव: कडक कारवाई न केल्यास सासष्टीमध्ये अमली पदार्थांची विक्री हा गंभीर मुद्दा बनण्याची शक्यता असल्याचे दक्षिण गोव्यातील स्थानिकांचे मत आहे. दरम्यान, छापे टाकणे, गुन्हे नोंदवणे आणि नियमित जनजागृती मोहीम राबवणे या रणनीतींवर लक्ष केंद्रित केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
सासष्टीमध्ये (Salcete) 2021 वर्षात अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा अंतर्गत 10 गुन्हे दाखल करण्यात आले होते, तर 2020च्या पहिल्या 10 महिन्यात 17 गुन्हे दाखल केले होते. पोलिसांनी (Police) दावा केला की, प्रकरणांची संख्या कमी झाली आहे. पोलिस खात्याने राबवलेल्या जनजागृती मोहीमेमुळे हा फरक पडला असल्याचा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
2021 मध्ये सासष्टी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या 10 गुन्ह्यांपैकी 4 गुन्ह्यांची नोंद मडगाव पोलिसांत, तीन कोलवा पोलिसांत, दोन फातोर्डा (Fatorda) पोलिसांत आणि एक गुन्हा कुंकळ्ळी पोलिस ठाण्यात नोंदवले गेले.
2020 मध्ये पहिल्या दहा महिन्यांत सासष्टी पोलिसांनी NDPS कायद्यांतर्गत 17 गुन्हे दाखल केले, त्यापैकी सात गुन्हे मडगाव पोलिसांनी, सहा फातोर्डा, प्रत्येकी दोन कोलवा आणि कुंकळ्ळी पोलिसांनी नोंदवले. पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.