Crime News  Dainik Gomantak
गोवा

Crime News : गांजाप्रकरणी रोनित विरुद्ध आरोप निश्‍चितीचा आदेश

त्यावरील सुनावणीवेळी संशयिताच्या वकिलांनी आरोप निश्‍चितीला विरोध करताना त्याच्याकडून जप्त केलेला हा गांजा नसून ती एका विशिष्ट प्रकारीच झुडपे असल्याचा दावा केला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Crime News : पणजी, राज्य न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालात संशयित रोनित चोणकर याच्याकडे सापडलेला पदार्थ हा गांजा असल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यामुळे त्याच्याविरुद्ध आरोप निश्‍चित करून खटल्यावरील सुनावणी सुरू करण्याचा आदेश म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायाधीश शर्मिला पाटील यांनी दिला आहे.

म्हापसा पोलिसांनी संशयित रोनित चोणकर याच्याविरुद्ध आरोपपत्र सादर केले होते. त्यावरील सुनावणीवेळी संशयिताच्या वकिलांनी आरोप निश्‍चितीला विरोध करताना त्याच्याकडून जप्त केलेला हा गांजा नसून ती एका विशिष्ट प्रकारीच झुडपे असल्याचा दावा केला होता.

मात्र म्हापसा पोलिसांनी प्रयोगशाळेने दिलेला अहवालच सादर केल्याने तो अंमलीपदार्थ असल्याचे उघड झाल्याने संशयिताचा दावा फेटाळण्यात येऊन आरोप निश्‍चित करण्याचे निर्देश देण्यात आले.

करासवाडा - म्हापसा येथील आयडीसीजवळ म्हापसा पोलिसांनी संशयित रोनित चोणकर याला २.०५० किलो गांजाप्रकरणी अटक केली होती.

त्याची किंमत सुमारे २ लाख रुपये होते. पोलिसांनी याप्रकरणी तपास करून न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते व जप्त करण्या आलेल्या अंमलीपदार्थाचा नमुना वेर्णा येथील राज्य न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला होता.

पोलिसांनी संशयिताकडून काही झुडपे जप्त करण्यात आली त्याला बिया, पाने व फांद्या होत्या त्याचेही नमुने पाठवण्यात आले होते. गांजा उत्पादन करण्यात येत असलेल्या झुडपाचे असल्याचे सादर केलेल्या अहवालात नमूद केल्याने हा पुरावा संशयिताविरुद्ध आरोप निश्‍चित करण्यात पुरेसे आहेत.

गांजाची झुडपे असलेली पिशवी पोलिसांनी संशयिताकडून जप्त करण्यात आली होती त्याचा आरोप निश्‍चितीवेळी संशयिताने विरोध केलेला नाही. त्यामुळे एनडीपीस कलम २२(सी) खाली आरोप निश्‍चित करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत असे न्यायालयाने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US War: यूएसएस जेराल्ड आर. फोर्डवर इराणचा भीषण हल्ला! ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 'जीव वाचवण्यासाठी अमेरिकन सैन्यानं काढला पळ'

Goa Drunk And Drive: कळंगुट वाहतूक पोलिसांचा मोठा दणका! मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या 165 जणांवर कारवाई; 4000 हून अधिक उल्लंघनकर्त्यांना दंड

IPL 2026: मुंबई इंडियन्स, हैदराबाद... 'या' 4 संघांचं 'प्लेऑफ'मधील स्थान पक्कं; दिग्गजांची मोठी भविष्यवाणी

झाडेझुडपे तोडून हजारो प्लॉट, शेकडो फ्लॅट, क्लब आणि कृत्रिम बीच; म्हणून कारापूर-सर्वण प्रकल्पास स्थानिकांचा विरोध..

Goa Murder Case: गोवा फिरायला आला अन्... कळंगुटमध्ये पर्यटकाची चाकूने भोसकून हत्या, कॅसिनोचा वाद विकोपाला

SCROLL FOR NEXT