Goa Theft Dainik Gomantak
गोवा

Mapusa Theft: कार, मोबाईल दिले फेकून! गोव्‍याची सीमा ओलांडण्‍यात दरोडेखोरांना यश; म्हापसा चोरीसाठी केला होता फुलप्रूफ प्लॅन

Ganeshpuri Mapusa Theft: गणेशपुरी-म्हापसा येथील डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा पडल्‍याच्‍या घटनेला पाच दिवस उलटले तरी गोवा पोलिसांच्या हाती अजून ठोस असे काहीच लागलेले नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: गणेशपुरी-म्हापसा येथील डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा पडल्‍याच्‍या घटनेला पाच दिवस उलटले तरी गोवा पोलिसांच्या हाती अजून ठोस असे काहीच लागलेले नाही. दुसरीकडे, हा तपास कुठपर्यंत पोहोचलाय, याबाबत औपचारिक माहिती देण्यास पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही कमालीची चुप्‍पी साधली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, हैदराबादहून काही पथके माघारी परतली आहेत. पोलिसांनी काही संशयितांना गोव्यात आणल्याचे समजते, परंतु त्‍याबाबत अधिकृत माहिती नाही. त्‍यांची म्‍हणे, कसून चौकशी सुरू आहे. याव्यतिरिक्त पोलिसांच्या हाती ठोस काहीच लागलेले नाही. त्यामुळे मुख्य दरोडेखोर हे अद्याप मोकाटच आहेत. त्यामुळे पोलिसांच्या एकंदर तपासाबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे.

मंगळवारी, ७ ऑक्टोबरला पहाटे ३ ते ५च्यादरम्यान सहा बुरखाधारी दरोडेखोर डॉ. महेंद्र कामत घाणेकर यांच्या घरात घुसले. पीडित कुटुंबीयांना बंधक बनवून घरातील रोख व मौल्यवान वस्तू मिळून ३५ लाखांच्‍या ऐवजावर त्‍यांनी डल्ला मारला. ही घटना उलटून पाच दिवस उलटले तरी गोवा पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर व तपासकामावर प्रश्‍‍नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

गोवा पोलिसांना या दरोड्याची माहिती घटनेच्या दिवशी पहाटे सहाच्या सुमारास मिळाली. तसेच सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होण्यास वेळ लागल्याने, पोलिसांचा तपास अपेक्षित वेळेत पुढे सरकू शकला नाही. दरोडेखोरांनी डॉ. घाणेकरांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर चोरून आपल्यासोबत नेला.

विशेष म्हणजे, सदर डीव्हीआर किचनमध्ये ठेवला होता, तरीसुद्धा दरोडेखोरांना तो सहज मिळाला. त्यामुळे दरोडेखोरांनी डॉ. घाणेकरांच्या बंगल्याची अनेकदा रेकी केली असावी. कारण ज्या पद्धतीने दरोडेखोरांनी या दरोड्याची अंमलबजावणी केली, ती फुलप्रुफ प्लॅननुसारच होती, हे आत्तापर्यंतच्या तपासात दिसून येत आहे.

पळून जाताना दरोडेखोरांनी पीडित कुटुंबीयातील चौघांचेही मोबाईल आपल्यासोबत नेले व बंगल्यापासून शंभर मीटरच्या अंतरावर ते चालू स्थितीत (ऑन) फेकून दिले. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी दरोडेखोरांनी अवलंबिलेला हा प्लॅनचा भाग असावा.

तसेच, जातेवेळी संशयितांनी डॉ. घाणेकरांची गाडी पळविणे व पणजीत मांडवी पुलाखाली ती सोडून देणे, हासुद्धा प्लॅनचा एक भाग असावा. कारण, पोलिसांचे लक्ष विचलित करून, आपल्‍याला गोव्याची सीमा ओलांडून जाण्यास पुरेसा वेळ मिळावा यासाठीच ही युक्ती असावी, असे प्रथमदर्शनी दिसते.

सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यांची गरज अधोरेखित

चोरीला गेलेली कार पणजीत शोधकार्य करताना पोलिसांना घटनेच्या दिवशी सकाळी ८ वाजता सापडली. त्यानंतर संशयित बेळगावच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्या टॅक्सीचालकाला शोधून आवश्यक माहिती गोळा करून बेळगावमध्ये पोहोचण्यास पोलिसांना बराच उशीर झाला जुन्या म्हापसा पालिकेजवळील इमारतीच्या उतरणीवर एका फुटेजमध्ये कारगाडी झळकते. त्यानंतर ही गाडी पुढे गेली कुठे, हे शोधण्‍यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागले.

ग्रीनपार्क जंक्शन काढून, एका रस्त्यावरील फुटेजमध्ये गाडी दिसते. त्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा व तपासाची दिशा पणजीच्या दिशेने वळवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

Border 2 Teaser: 'लाहोरपर्यंत आवाज गेला पाहिजे...' पाकिस्तानला धडकी भरवणारा बॉर्डर 2 चा टीझर रिलीज; देओलचा रुद्र अवतार पाहून व्हाल अवाक VIDEO

Goa Assembly Winter Session 2026: गोवा सरकारचे हिवाळी अधिवेशन 12 जानेवारीपासून; रामा काणकोणकर हल्ला, हडफडे आग प्रकरण गाजणार

SCROLL FOR NEXT