Extra MSRTC Buses In Konkan During Ganeshotsav 2023 Dainik Gomantak
गोवा

गणेशोत्सवासाठी कोकणात 3,500 जादा एसटी बस; केव्हा सुरू होणार आणि कोठे बस पकडाल? जाणून घ्या सविस्तर

Pramod Yadav

Extra MSRTC Buses In Konkan During Ganeshotsav 2023: सर्वांच्या लाडक्या गणरायाचे 19 सप्टेंबर रोजी आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाल आहे. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणात येत असतात.

एसटी महामंडळाने यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात 3,500 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 14 ते 19 सप्टेंबरदरम्यान या जादा गाड्या चालविण्यात येणार

राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बस स्थानकांतून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

कोकणात जाणाऱ्या जास्तीत जास्त चाकरमान्यांनी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही एसटी महामंडळाने केले आहे.

बसेचे आरक्षण बस स्थानकावर किंवा महामंडळाच्या संकेतस्थळावर मोबाईल अथवा संगणकावरून करता येणार आहे. ॲपद्वारे, खासगी बुकिंग एजंटकडे उपलब्ध होणार आहे.

गणपतीपूर्वी महामार्गाची एक लेन खुली होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुंबई गोवा महामार्गाची एक लेन गणपतीपूर्वी करण्याचा मानस असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.


'मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्नशील आहे. गणपतीच्या आधी या महामार्गावरील एका लेनचे काम पूर्ण करण्याचा विचार आहे. मुंबई- सिंधुदुर्ग मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवालाचे काम अंतिम टप्प्यात आहे.' असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

SCROLL FOR NEXT