Goa Ganesh Visarjan 2021 Dainik Gomantak
गोवा

Ganesh Visarjan 2021: पाच दिवसांच्या गणपतींचे भक्तिमय वातावरणात विसर्जन

वास्कोत वाडे, तळ्यात, खारीवाडा, बायणा समुद्रकिनारी संध्याकाळपासून विसर्जनाला सुरुवात

Dainik Gomantak

Ganesh Visarjan 2021: पाच दिवसांच्या गणपतीचे आज थाटात विसर्जन (5 Days Ganesh Visarjan) करण्यात आले. लोकांचा उत्साह, भक्ती यामुळे कोरोनाचा विसर पडल्याने चतुर्थी उत्साहवर्धक व भक्तिमय वातावरणात पार पडली. दीड दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर आज पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. यात लोकांचा उत्साह पराकोटीचा दिसून आला. यात कोरोना महामारीचा विसर पडल्यातच जमा झाले. कारण गेल्या वर्षीची चतुर्थी (Ganesh Chaturthi) काळातील परिस्थिती आणि यंदाची चतुर्थी यामध्ये जमीन-आसमानचा फरक जाणवत होता. गेल्या वर्षी सर्व काही बंधनाच्या कचाट्यात होते, तर यंदा कोरोना महामारी काळात कोणती काळजी घ्यावी. तसेच नियम प्रणालीनूसार प्रत्येक घराघरात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रत्येक घरातील कुटुंबाचा आनंद ओसंडून वाहत होता. वर्ष पद्धतीप्रमाणे लोकांनी श्रीगणेशाची मनोभावे सेवा करून गणरायाला निरोप दिला. दरम्यान आज वास्कोत वाडे तळ्यात, खारीवाडा, बायणा समुद्रकिनारी संध्याकाळपासून विसर्जनाला सुरुवात झाली. प्रत्येक ठिकाणी लाईफ गार्ड गणेश मूर्तीचे खोल पाण्यात विर्सजन करीत होते. तसेच वाडे, तळ्यात लाइफगार्ड द्वारे तळ्याच्या मधोमध गणपतीचे विसर्जन करत होते. रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका चालू होत्या. मात्र यंदा दिंड्यांना फाटा देण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: गोवा नाईट क्लब आग प्रकरण! दोषींवर कठोर कारवाई होणारच; मुख्यमंत्री सावंत आक्रमक

बेळगावचे विभाजन होणार? नवीन तीन जिल्हे निर्माण करण्याची मागणी; अधिवेशनात चर्चा

Goa Live Updates: 'इंडिगो संकटा'तही दाबोळी विमानतळाचे सुरळीत कामकाज; वाढीव कर्मचारी, गर्दी व्यवस्थापन आणि MoCA कडून कौतुक

Goa Tourism: सुट्टीसाठी गोव्यात चाललाय? 'Akshaye Khanna'ने शुटींग केलेली एकमेव जागा पाहा; 24 वर्षांनंतरही पर्यटक करतात तुफान गर्दी

Video: 36 वर्षांपूर्वी लाहोरमध्ये विनोद खन्नांनी केलेली 'ती' स्टेप; अक्षय खन्नाचा FA9LA डान्स वडिलांची 'Copy'?

SCROLL FOR NEXT