Ganesh Chaturthi matoli  Dainik Gomantak
गोवा

Matoli Goa: ..बाळ भक्ता लागे तूचि आसरा! गणरायाच्या आगमनाची तयारी; 'माटोळी'साठी पावले वळली रानाकडे

Goa Ganesh Chaturthi matoli: बेतोडा, निरंकाल, कोनशे, कोडार आदी भागातील वन क्षेत्र माटोळीच्या साहित्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे सध्या अनेकजण या भागात माटोळी साहित्य गोळा करण्यासाठी फिरताना दिसतात.

Sameer Panditrao

बोरी: गणेश चतुर्थी जवळ येऊन ठेपल्याने माटोळी साहित्य विक्री करणाऱ्यांची पावले मोटोळीचे साहित्य गोळा करण्यासाठी वळू लागली आहेत. बेतोडा, निरंकाल, कोनशे, कोडार आदी भागातील वन क्षेत्र माटोळीच्या साहित्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे सध्या अनेकजण या भागात माटोळी साहित्य गोळा करण्यासाठी फिरताना दिसतात.

बोरी बायथाखोल ढवळीची उतरण तसेच बेतोडा बगल रस्ता फोंडा बाजार परिसरात गणेशचतुर्थीच्या माटोळी साहित्याची विक्री सर्रासपणे होत असते. बेतोडा, निरंकाल, कोनशे, कोडार आदी भागातील रानात फिरून लोक कांगले, कुंडल, घागरे, करमळ, रानखुर्द, रानकेळी आदी विविध फळावळ गोळा करून आणतात.

त्याचप्रमाणे माटोळीला बांधण्यासाठी हरणाची फुले बांधण्यासाठी दोर चतुर्थीला चार दिवस बाकी असताना काढून आणतात. त्याच्या जुड्या बांधून बाजारात तसेच रस्त्याशेजारी थांबून विक्री करतात.

माटोळीच्या साहित्याचा दर वाढणार

यावर्षी गणेशचतुर्थी उत्सव पंधरा दिवस अगोदर आल्याने रानफळे अद्याप तेवढीशी तयार झालेली नाहीत. गेले काही दिवस रानात फिरून कुठे कुठे रानफळे उपलब्ध होतील याची पाहणी करण्यात येत आहे.

वन क्षेत्रातील बऱ्याच भागात झाडांची, वेलींची तोडणी करण्यात आल्याने रानफळे कमी प्रमाणात मिळतात, त्यामुळे या वर्षी माटोळीच्या साहित्याचा दर वाढणार, असे नागरिक गावडे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT