Goa Ganesh Festival  Dainik Gomatnak
गोवा

Ganesh Chaturthi 2025: '40 वर्षांची' परंपरा, 2 महिने गाव सोडून करतात गणेशभक्तांची सेवा; पेडण्यात होते चर्मवाद्यांची दुरुस्‍ती

Goa Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीचा सणाच्‍या पार्श्वभूमीवर राज्‍यात विशेषत: गावागावांत चर्मवाद्य दुरुस्‍ती करणारे कारागीर दाखल झाले आहेत. पेडणे शहरातही असे कारागीर महाराष्‍ट्रातील पंढरपूर येथून आले आहेत.

Sameer Panditrao

मोरजी: गणेश चतुर्थीचा सणाच्‍या पार्श्वभूमीवर राज्‍यात विशेषत: गावागावांत चर्मवाद्य दुरुस्‍ती करणारे कारागीर दाखल झाले आहेत. पेडणे शहरातही असे कारागीर महाराष्‍ट्रातील पंढरपूर येथून आले आहेत. योगेश पवार, त्यांची पत्नी सोनाली पवार, आई मीना मुकेश पवार, मुलगे प्रथमेश, गणेश व मुलगी जान्‍हवी असे हे कुटुंबच पेडण्‍यात वाद्य दुरुस्‍ती करण्‍याचे काम करत आहेत.

पवार कुटुंब मागच्या ४० वर्षांपासून पेडणे शहरात चतुर्थीच्या दोन महिने अगोदर येऊन तबला, मृदंग, घुमट आणि अन्‍य वाद्ये दुरुस्ती करण्यासाठी येतात. विशेष म्‍हणजे स्‍थानिकांच्‍या तुलनेत त्‍यांचा शुल्‍क खूपच कमी असते. चाळीस वर्षांपूर्वी योगेश यांचे वडील मुकेश पवार हे पेडण्‍यात येऊन सदर काम करायचे. तीच परंपरा आता त्‍यांचा मुलगा आणि नातवंडे पुढे नेत आहेत.

चर्मवाद्य दुरुस्‍त करण्‍याबरोबरच नवीन वाद्येही कमी किमतीत उपलब्‍ध करून देण्‍याचे काम पवार कुटुंबाकडून केले जात आहे. तसेच या वाद्यांसाठी जे-जे साहित्य लागतं, ते सोलापूर भागातून आणून या ठिकाणी आपल्या ग्राहकांना उपलब्‍ध करून देत असतात.

मुलांचा दोन महिने ऑनलाईन अभ्‍यास

योगेश पवार यांना दोन मुलगे असून एक नववीत तर दुसरा दहावीत शिकत आहे. मुलगी आठवीत आहे. ज्या शाळेत ही मुलं जातात, तेथील मुख्याध्यापकांकडे दोन महिने ऑनलाइन पद्धतीने अभ्यास करण्यासाठी परवानगी घेतात आणि आपल्‍या पालकांबरोबर व्‍यवसायाच्‍या निमित्ताने गोव्‍यात येतात. योगेश पवार हे ‘योगेश तबला मेकर’चे सर्वेसर्वा आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

SCROLL FOR NEXT