Mapusa Market|Ganesh Chaturthi|Ganeshotsav Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi 2024: चवथीची लगबग! माटोळी, फुलांच्या माळांनी म्हापसा मार्केट गजबजले

Ganeshotsav 2024: सजावटीसाठी लागणारी सामग्री, आतषबाजी, माळा, हार, माटोळी साहित्य खरेदीसाठी म्हापसा बाजारात गर्दी

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Market|Chavath

बार्देश: मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजऱ्या होणाऱ्या गणेशचतुर्थीचा उत्सव अवघ्या ९ दिवसांवर येऊन ठेपल्याने गोव्याच्या इतर भागांबरोबरच म्हापशात गणेशचतुर्थीला लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी लगबग सुरू झालेली आहे. गणेशचतुर्थीचा उत्सव साजरा करण्यासाठी लागणाऱ्या सामग्रीचा बाजार म्हापशात हळूहळू भरायला लागला आहे.

कुटुंबातील महिलावर्गाने चतुर्थीच्या निमित्ताने घरात विविध मिठाई, करंज्या, चकली बनवायला सुरवात केली आहे. त्याचेही साहित्य बाजारात उपलब्ध झाले आहे. विविध दुकानांवर गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सजावटीसाठी लागणारी सामग्री, आतषबाजी, माळा, हार, माटोळीला बांधण्यात येणारी सामग्री (लाकडी फळे आदी), सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या विविध रंगांच्या पताका, मकर सजावटीसाठी लागणारे साहित्य विक्रीला उपलब्ध झाले आहे.

मोठे पाट ६००० रुपयांपर्यंत

लाकडी साहित्य विक्री करणारे सुरेश गोवेकर यांनी सांगितले की, फणस, आंबा व जंगली झाडांपासून बनविलेल्या मध्यम ते मोठे पाट ३०० ते ६००० रुपये जोडी, लाटफळे ५०० रुपये जोडी, पोपट पाट जोडी १५०० रुपये, विळी ६०० ते १००० रुपये अशा दराने विकले जातात. तसेच हारतुरे विकणारे पोवळेकर यांनी सांगितले की, आमच्याकडे कागदी, प्लास्टिक, कापडी, वेस्टेरियान, पानांचे हार विक्रीस आहेत. त्यांची किंमत ५० रुपये ते १ हजार रुपयांपर्यंत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT