Ganesh chaturthi Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: 'बाप्पा'साठी कायपण! भर पावसात चतुर्थी बाजारासाठी गर्दी; गोमंतकीयांचा उत्साह कायम

Ganesh chaturthi 2025: गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचा खरेदीवर परिणाम जाणवत असला, तरीही नागरिक पावसातच चतुर्थीची खरेदी जोरात करताना दिसत आहेत.

Sameer Panditrao

वाळपई: अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश चतुर्थीची खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचा खरेदीवर परिणाम जाणवत असला, तरीही नागरिक पावसातच चतुर्थीची खरेदी जोरात करताना दिसत आहेत. किराणा मालासह इतर आवश्यक वस्तू खरेदीसाठी गर्दी होत असून दररोज लाखोंची उलाढाल होत आहे.

गोवा बागायतदार, सत्तरी तालुका शेतकरी सोसायटी, वाळपई सुपर मार्केट आदी आस्थापनांमध्ये लोकांची मोठी वर्दळ आहे. सर्व साहित्य एकाच छताखाली मिळत असल्याने नागरिकांची पसंती याच आस्थापनांकडे आहे. विशेषतः गोवा बागायतदारमध्ये सर्वाधिक गर्दी दिसून येते. सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेसातपर्यंत ही आस्थापने गजबजलेली असतात.

ग्रामीण भागातील नागरिक लवकरच बाजार गाठतात. मात्र यंदा किराणा मालाच्या किमती गगनाला भिडल्याने महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. वाळपई सुपर मार्केटमध्ये चांगल्या दर्जाचा माल उपलब्ध करून दिला असून, विविध वस्तूंवर सवलती ठेवण्यात आल्या आहेत. येथे पुजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य, पडदे, फुलांचे हार, रंगीबेरंगी तोरण, विजेसाठी लागणारे साहित्य अशा विविध वस्तू किफायतशीर दरात उपलब्ध आहेत.

हार व फुलमाळा ६० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत, पडदे ६० रुपयांपासून, तर सजावटीचे साहित्य ५०० रुपयांपासून पुढे अशा दराने मिळते. शहरात अशा प्रकारचे दुकान नसल्याने अनेकजण या सुपर मार्केटला प्राधान्य देतात.

आस्थापनाचे मालक राजू उर्फ रुद्रेश मणेरकर म्हणाले,‘गणेश चतुर्थी हा आनंदाचा सण आहे. सत्तरीतील नागरिकांना एका छताखाली दर्जेदार साहित्य कमी किमतीत उपलब्ध व्हावे यासाठी आम्ही यंदा सर्व साहित्य उपलब्ध केले आहे. पूर्वी नागरिकांना म्हापसा, पणजी, मडगाव किंवा बेळगावला जावे लागे. मात्र यंदा स्थानिक मागणी लक्षात घेऊन साहित्य उपलब्ध केल्यामुळे चांगला प्रतिसाद मिळत आहे.

खरेदीवर आकर्षक ऑफर्सदेखील आहेत. दोन हजारांच्या खरेदीवर १ किलो साखर, तीन हजारांच्या खरेदीवर १ लिटर रागी तेल, चार हजारांच्या खरेदीवर १ जूट बॅग आणि पाच हजारांच्या खरेदीवर ५ किलो सम्राट पीठ मोफत दिले जात आहे.

गोवा बागायतदार आस्थापनात १९ ते २६ ऑगस्ट दरम्यान १९९९ रुपयांपेक्षा जास्त खरेदीवर २% सवलत दिली जात आहे.वाळपई शहर सध्या भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे. इलेक्ट्रॉनिक दुकानदार बाप्पाचे सूर लावू लागले आहेत. कपड्यांच्या दुकानांतही गर्दी वाढली असून ऑनलाइन खरेदीपेक्षा प्रत्यक्ष दुकानात आवडते कपडे निवडण्याकडे लोकांचा कल जास्त आहे. याशिवाय सध्या ऑनलाईन मार्केटिंगमध्ये खरेदीवर सूट मिळते, पण जिथे दुकानात प्रत्यक्ष वस्तू हाताळता येते, शिवाय सूट मिळते, अशा दुकानांकडे ग्राहकांची पावले आपसूक वळताना दिसतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Digital Taxi Policy: गोव्यात लवकरच नवीन 'टॅक्सी धोरण', 10 सप्टेंबरपर्यंत मसुदा तयार करण्याचे मुख्यमंत्री सावंतांचे निर्देश; बैठकीनंतर अखेर तोडगा

Rohit Sharma: 'अनुभव हीच त्याची सर्वात मोठी ताकद, रोहित असा लीडर आहे...' राहुल द्रविडकडून 'मुंबईच्या राजा'वर स्तुतीसुमनांचा वर्षाव

Sachin Tendulkar In Goa: 'क्रिकेटचा देव' गोव्यात, काणकोणात क्रीडांगणाचं केलं उद्‌घाटन, विद्यार्थ्यांशीही साधला संवाद

काँग्रेस आमदाराच्या गोव्यातील कॅसिनोंवर ईडीचे छापे; पहाटे पाचपासून झाडाझडती सुरु

Navpancham Rajyog 2025: 27 ऑगस्टपासून 'या' राशींसाठी 'शुभ काळ' सुरू, शुक्र बनवणार शक्तिशाली राजयोग; आर्थिक लाभ होणार

SCROLL FOR NEXT