Matoli Dainik Gomantak
गोवा

लागा तयारीला! गोवा सरकारची माटोळी आणि देखावा स्पर्धा जाहीर, पावणे दोन लाखांची बक्षीसं जिंकण्याची संधी

Pramod Yadav

पणजी: आगामी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गोवा राज्य सरकारच्या कला आणि सांस्कृतिक खात्याच्या वतीने माटोळी आणि देखावा स्पर्धा जाहीर केलीय. माटोळी स्पर्धा वैयक्तिक तर देखावा स्पर्धा सार्वजनिक मंडळांसाठी असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून पावणे दोन लाख रुपयांची बक्षीसं दिली जाणार आहेत.

माटोळी स्पर्धा

राज्यस्तरीय माटोळी स्पर्धा ०९ ते १२ सप्टेंबर २०२४ या काळात आयोजित केली जाणार आहे. यात एकूण दहा बक्षीसं काढली जातील. पहिल्या क्रमांकासाठी - २० हजार, दुसरा क्रमांक - १५ हजार, तिसरा क्रमांक - १२ हजार, चौथा क्रमांक - दहा हजार, पाचवा क्रमांक आठ हजार आणि इतर पाच क्रमांकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे.

राज्यस्तरीय देखावा स्पर्धा

सार्वजनिक मंडळासाठी राज्यस्तरीय देखावा स्पर्धा १३ ते १६ सप्टेंबर २०२४ या काळात आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत देखील एकूण दहा बक्षिसांचे वाटप केले जाणार आहे.

पहिले बक्षीस - ३५ हजार, दुसरे बक्षीस - ३० हजार, तिसरे बक्षीस - २५ हजार, चौथे बक्षीस- वीस हजार, पाचवे बक्षीस - १५ हजार आणि इतर पाच जणांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

अर्ज कसा कराल?

माटोळी किंवा देखावा स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी गोवा कला आणि सांस्कृतिक विभागाकडे अर्ज करणे आवश्यक आहे. मडगाव, कुडचडे, साखळी वास्को येथील रविंद्र भवन आणि फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरात स्पर्धेचे अर्ज उपलब्ध आहेत.

तसेच, कला आणि सांस्कृतिक विभागाच्या संकेतस्थळावरुन देखील स्पर्धेसाठी अर्ज डाऊनलोड करता येईल. येत्या ०९ ऑगस्टपासून स्पर्धेसाठी अर्ज करता येईल. ३० ऑगस्ट स्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. व्यवस्थितपणे भरलेला अर्ज वर नमूद केलेल्या कोणत्याही कार्यालयात जमा करता येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: अमित पाटकर इफेक्‍ट?

Goa Accidents: 'गोव्यातील भाजप सरकारने चतुर्थी उत्सवात अंधार पसरवला'; अपघातांवरून पाटकर यांचा घणाघात

Old Goa Church: ओल्ड गोव्याची चर्च उद्या पर्यटकांसाठी बंद!!

Curchorem Roads: जलवाहिनीसाठी पुन्हा रस्ते खोदणार! कुडचडेत होणार रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती

'गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्‍येने गोव्‍यात यावे'; गुजरातमधील परिषदेत मुख्‍यमंत्री सावंतांचे आवाहन

SCROLL FOR NEXT