बाणस्तारी येथे भरलेला माटोळी बाजार
बाणस्तारी येथे भरलेला माटोळी बाजार Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi 2021: अखेर बाणस्तारीत माटोळी साहित्याचा भरला बाजार

दैनिक गोमन्तक

खांडोळा: ‘कोविड’ मुळे गेले चार महिने बंद असलेला बाणस्तारी बाजार गेल्या आठवड्यापासून सुरू झाला आहे. मंगळवारी (ता. 7 ) बुधवारी (ता. 8 ) खास गणेशचतुर्थीसाठी माटोळी साहित्याचा बाजार भरविण्यात आला आहे. कोविड, पावसाचे सावट असूनही बाजारात ग्राहक-विक्रेत्यांचा उत्साह कायम आहे. मूळ मार्केट प्रकल्पाचे काम सुरू असल्यामुळे श्री हनुमान मंदिराजवळ बाजार भरविण्यात आले आहे. तसेच हमरस्त्यांच्या बाजूलासुद्धा मोठ्या संख्येने व्यापारी बसले आहेत.

गणेश चतुर्थीसाठी लागणारे माटोळीचे सामान खरेदी करण्यासाठी प्रत्येकजण बाजाराची आतुरतेने वाट पाहत असतो. बाजारात श्रीगणेशाला प्रिय असलेल्या निसर्गातील माटोळीच्या वस्तू म्हणून विक्रीला आहेत. त्यात सुपारीचे, केळ्यांचे घड, नारळाच्या पेणी, नारिंग, तोरीण, भोपळा, टरबूज वेगवेगळी जंगली फळे, चिकू, फणस, वेगवेगळ्या प्रकारची भाजी बाजारात उपलब्ध आहे.

आज दुपारी पावसामुळे बाजारात गर्दी कमी होती. पण, संध्याकाळी काही प्रमाणात गर्दी वाढली. याशिवाय तिवरे, माशेल परिसरातही मोटीळीचे साहित्य रस्त्याच्या बाजूला विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत. बाजारात जागा अपुरी असल्यामुळे रस्त्याच्या बाजूलाही बाजार भरला आहे. चतुर्थी आणि बाणस्तारीतील माटोळीचा बाजार हे जणू समीकरणच बनले आहे. पोर्तुगीज काळापासून हा बाजार प्रसिद्ध आहे. बहुतांश गोमंतकीय या बाजाराला भेट देतात. दोन दिवसांत तेथे लाखो रुपयांची उलाढाल होते.

मागील मंगळवारी बाजारातील वातावरण कमालीचे उत्साहपूर्ण होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातील घाऊक व्यापारी आणि स्थानिक लोकही ओझ्याच्या सामान खरेदीसाठी बाजारात आले होते. सुपारीचे कात्रे, केळ्यांचे घड, नारळांच्या पेंडी, आणि माटोळीच्या फळांचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Parab Passed Away: ज्येष्ठ प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन परब यांचे निधन

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

‘या’ देशाच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची निर्घृण हत्या, खळबळजनक खुलासा; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

SCROLL FOR NEXT