Calangute Theft Case
Calangute Theft Case Dainik Gomantak
गोवा

Goa News: जुगारामुळे स्नूकर खेळाडू बनला चोरटा

दैनिक गोमन्तक

Goa News: राज्यात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील स्नूकर खेळाडू सुलेमान शेख (30, नुवे) याच्यासह त्याचा साथीदार शब्बीरसाहब शदावली (30 , फातोर्डा) या दोघांना घरफोडी व वाहन चोरीप्रकरणी पर्वरी पोलिसांनी अटक केली आहे. सुलेमान शेख याने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील स्नूकर प्रकारात गोव्याचे प्रतिनिधित्व केले होते. सुलेमान शेख व शब्बीरसाहब शदावली या दोघांना कसिनो जुगाराचा छंद होता.

पैशांच्या चणचणीमुळे झटपट पैसा मिळवण्यासाठी व आपला छंद पूर्ण करण्यासाठी ते चोरीकडे वळले. 4 घरफोड्यांची व 2 वाहन चोरीची त्यांनी कबुली दिली आहे. त्यांच्याकडून दोन दुचाकी व 8.5 लाखांचे 162 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. या चोरीच्या टोळीमध्ये आणखी गुंतले आहेत का याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली.

दोघा संशयितांनी गेल्या जुलै महिन्यापासून चोरी केलेल्या वाहनांचा वापर बंद असलेली घरे व फ्लॅट फोडण्याचे प्रकार करत होते. त्यांनी पर्वरीत २ तसेच म्हापसा व म्हार्दोळ येथे प्रत्येकी १ घरफोडी केली होती. पर्वरी व मडगाव येथून प्रत्येकी एक स्कूटर्स चोरी केली होती. हे चोरटे मोबाईलचा वापर करत नव्हते. मात्र, विविध भागातील सीसी टीव्ही कॅमेऱ्याद्वारे त्यांनी चोरलेल्या एका स्कूटरच्या माहितीच्या मदतीने त्यांना अटक करण्यात आली.

संशयित शब्बीरसाहब याच्या फातोर्डा येथील घराची झडती घेतली असता सोने गोठवलेली व काही सोन्याच्या वस्तू तसेच डायमंड तपासणी किट्सही जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे 1 लाख रुपये आहे. या कारवाईत पोलिस उपअधीक्षक विश्‍वेश कर्पे व पर्वरीचे निरीक्षक राहुल परब यांनी तसेच त्यांच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी गेल्या काही महिन्यांपासून केलेल्या तपासकामाची महत्त्वाची कामगिरी बजावली.

पर्वरी परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणातील चोरटे हे दुचाकीवरून येत बंद असलेल्या घरांत वा फ्लॅटमध्ये चोरी करत असल्याची माहिती मिळाली होती. ते इतर भागातील चोऱ्यांमध्येही सामील होते असेही पुरावे हाती आले होते. त्यामुळे त्यांच्या शोधार्थ वेगवेगळी पोलिस पथके स्थापन करण्यात आली. सुमारे 50 हून अधिक ठिकाणच्या सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे या प्रकरणाची माहिती मिळवण्यात आली. तांत्रिक सर्वेलन्सच्या आधाराने स्कूटरने फिरणाऱ्या दोघा संशयितांवर नजर ठेवण्यात आली.

10 नोव्हेंबर 2023 रोजी संशयितांनी पर्वरीतून ‘रेंट ए बाईक’ची चोरी केली होती व नरकासुर दहनाच्या रात्री, दीपावलीच्या दिवशी ते चोऱ्या करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार विविध पोलिस पथके स्थापून तसेच गस्तीवर पोलिस ठेवून त्यांच्यावर नजर ठेवण्यात आली होती. नरकासुर दहनाच्या रात्री संशयास्पदरीत्या स्कूटरवरून फिरत असलेल्या दोघा तरुणांना पर्वरी स्पोर्टस् क्लबच्या ठिकाणी पोलिसांनी अडविले असता त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला.

त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आले व त्यांचा चौकशी केली असता त्यांनी पर्वरी तसेच इतर भागातील घरफोड्या तसेच वाहन चोरीची कबुली दिली. त्यांनी चोरलेले सुमारे ६ लाखाचे सोने फायनान्सियल कंपन्यांमध्ये तारण ठेवून त्यावर पैसे उकळले आहेत. ते लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचे वाल्सन यांनी सांगितले.

गणेशचतुर्थी, दीपावली तसेच इतर उत्सवाच्यावेळी काही लोक घरे किंवा फ्लॅट बंद करून मूळ घरी जातात त्याची माहिती हे संशयित चोरलेल्या स्कूटरवरून टेहळणी करायचे. रविवारी सुट्टीच्या दिवशी घर किंवा फ्लॅट बंद करून लोक बाहेर जात होते त्यांनाही लक्ष्य केले जात होते. अटक करण्यापूर्वी त्यांनी राज्यातील विविध भागात बंद असलेली 10 घरे वा फ्लॅटफोडीसाठी ठिकाणे शोधली होती.

हे दोघेही सराईत चोरटे असून त्यांचे आणखी काही साथीदार आहेत का याचा शोध पर्वरी पोलिस घेत आहेत. संशयित शब्बीरसाहब हा सेकंडहँड कार विक्रीचा व्यवसाय करतो. शब्बीरसाहब व सुलेमान शेख यांना पर्वरीतील चोरीच्या गुन्ह्यामधील तपास पूर्ण झाल्यानंतर इतर पोलिस स्थानकाच्या क्षेत्रात केलेल्या चोरीप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात दिले जाईल, अशी माहिती वाल्सन यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT