Fukeri Dam Project 
गोवा

महाराष्ट्राचे फुकेरी धरण,चांदेल प्रकल्पाच्या मुळावर!

धरणाचं काम युद्धपातळीवर, जंगलतोड सुरु, दोडामार्ग, सावंतवाडी भागात पुरवणार पाणी

दैनिक गोमन्तक

पर्ये : महाराष्ट्र सरकारच्या लघु पाटबंधारे विभागाने दोडामार्ग तालुक्यातील फुकेरी गावाजवळील जंगलात धरणाचे काम सुरू केले असून जंगलतोड सुरू आहे. या कामामुळे पेडणे तालुक्याला पेयजलाचा पुरवठा करणारा चांदेल जलशुध्दीकरण प्रकल्प संकटात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहे. (Fukeri Dam will create problem to chandel water project News Updates)

या प्रकल्पासाठी जानेवारी 2021 मध्ये महाराष्ट्र सरकारने प्रशासकीय तर फेब्रुवारी 2021 रोजी तांत्रिक मान्यता दिली आहे. या धरणाचे पाणलोट क्षेत्र 2.12 चौकिमी. आहे तर धरणात 5.30 दशलक्ष चौ. घनफुट मीटर जलसंचय होणार आहे. यामुळे सुमारे 248 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. या प्रकल्पाला 65.60 कोटी रुपये खर्च येणार आहे. धरणाचे पाणी 900 मि.मी. व्यासाची लोखंडी जलवाहिनी टाकून पाणी दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे, तळकट, शिरवल तर सावंतवाडी तालुक्यातील असनिये, तांबोळी आदी भागात पुरवले जाणार आहे.

कर्नाटक (Karnataka) सरकारचा गोव्याशी असलेला म्हादई जलतंटा सुटलेला नसताना महाराष्ट्र सरकारने फुकेरी गावच्या घाटमाथ्यावर धरण प्रकल्पाचे काम गतीने हाती घेतले आहे. डॉ. माधव गाडगीळ पश्चिम घाट तज्ज्ञ समितीने 2011 मध्ये फुकेरीचा समावेश पर्यावरणीय संवेदनाक्षम क्षेत्रात समावेश केला होता. तसेच संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने 2013 साली सावंतवाडी- दोडामार्ग पट्ट्यातील जंगल राज्य आणि केंद्र सरकारने संयुक्तरित्या सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले होते. पण, असे असताना जलसिंचन आणि पेयजलाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी फुकेरी धरण उभारण्याची कास महाराष्ट्र सरकारने धरली असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड चालवली आहे. फुकेरी गावातील 'सात तळ्यांचा धबधबा' कडून प्रवाहित होणारी फुकेरी नदी गावातील नाल्याशी जिथे एकरूप होते त्या 'दोणीखोल' भागात धरण उभारण्याचे काम सुरु आहे.

दरम्यान, या प्रकल्पाला जमीन गेलेल्या ग्रामस्थांना भरीव भरपाई देण्याचे आमिष सरकारकडून दाखवले जात आहे. सध्या या प्रकल्पासाठी जंगलतोड होत असून ऐतिहासिक हनुमंत गड परिसरात हा प्रकल्प येतो. दरम्यान, या प्रकल्पासंबंधी जलसिंचन खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी महाराष्ट्र सरकारच्या जलसिंचन खात्याच्या अभियंत्याकडे चर्चा करून या प्रकल्पाची सविस्तर माहिती मागितली आहे.

फुकेरी येथून वाहणारी नदी तळकट मार्गे कळणे नदीला मिळते. आणि याच कळणे नदीवर पेडणे तालुक्याला पेयजल पुरवठा करणारा चांदेल जलशुद्धीकरण 15 एमएलडी प्रकल्प आहे. गोवा (Goa) सरकारकडून या प्रकल्पाची क्षमता 30 एमएलडीपर्यंत वाढवण्याची प्रकिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले हे काम पेडणे (Pernem) तालुक्यातील लोकांच्या तोंडचे पाणी पळवणारे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

Goa Baby Day Care Centre: नोकरदार पालकांसाठी खुशखबर! गोव्यात ९ ठिकाणी सरकारतर्फे पाळणाघर; केंद्रांची यादी, नियमावली वाचा

U19 Cooch Behar Trophy: द्विशतकी भागीदारीनं गोव्याला सतावलं, ॲरन-सिद्धार्थच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादनं गाठला मोठा टप्पा

Indian Super League 2024: ०-१ ने पिछाडीवर असलेल्या सामन्यात एफसी गोवाचं जबरदस्त कमबॅक, 'पंजाब'ला 'दे धक्का'

Goa Live Updates: २८ कोटीच्या इफ्फी खर्चाबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करण्याची गरज; आणि गोव्यातील काही रंजक बातम्या

SCROLL FOR NEXT