Goa Flight Rate Increased Dainik Gomantak
गोवा

Dubai Flight: दाबोळीहून दुबईला जाणाऱ्या विमानातून इंधन गळती..!

दैनिक गोमन्तक

Dubai Flight: दाबोळीहून दुबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात इंधन गळती झाल्याची घटना काल मध्यरात्री उघडकीस आल्यानंतर या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. त्यामुळे प्रवासी रात्रीपासून दाबोळी विमानतळावर ताटकळत राहिल्याने काही वेळ गोंधळ माजला. या प्रवाशांची आज रात्री दुबईला जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

दाबोळी विमानतळावर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या एका घटनेत प्रवाशांना घेऊन दुबईला जाणाऱ्या एका एअर इंडियाच्या विमानात इंधन गळती लागल्याचे उघड झाले. दाबोळी विमानतळावरून शुक्रवारी मध्यरात्रीनंतर 1 वाजता हे विमान 149 प्रवाशांना घेऊन दुबईला जाणार होते.

प्रवाशांना घेऊन उड्डाण करण्यापूर्वी विमानाची तपासणी केली असता विमानातून इंधन गळती होत असल्याचे उघड झाले. त्यानंतर त्या विमानाचे उड्डाण रद्द करून विमानाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार, शनिवारी (ता.१६) उशिरा संध्याकाळी विमानाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून ते विमान शनिवारी उशिरापर्यंत १०७ प्रवाशांना घेऊन दुबईला जाण्यासाठी रवाना होईल.

अज्ञाताच्या बॅगेमुळे गोंधळ

दिल्लीहून 171 प्रवाशांना घेऊन शुक्रवारी (ता. 15) दाबोळी विमानतळावर उतरलेल्या एअर इंडिया एक्सप्रेस विमानात अज्ञात बॅग आढळल्याने प्रवाशांत आणि दाबोळी विमानतळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

दिल्लीहून आलेले हे विमान सुरक्षेच्या दृष्टीने ‘आयझोलेटेड बे’ वर उतरवून प्रवाशांना सुरक्षित स्थळी नेल्यानंतर बॅग तपासली असता त्यात फक्त कपडे असल्याचे उघड झाले. ते विमान गोव्यात येण्यापूर्वी दिल्लीला प्रवाशांना घेऊन उतरले असता तेथे एका प्रवाशाने चुकून आपली बॅग विमानातच ठेवून तो विमानातील एका ‘क्रु’ची बॅग घेऊन गेल्याचे उघड झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

Goa Today's News Live: हिंदुत्ववादी संघटनांचे वेलिंगकरांना समर्थन, ख्रिस्ती समाजाकडून अटकेची मागणी; राज्यभरात मोर्चे

Sunburn Festival 2024: सनबर्नविरोधात कामुर्लीत स्थानिकांचा कडक विरोध; उद्याची बैठक ठरणार निर्णायक!

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

Goa Navratri 2024: छत्रपती शाहू महाराजांच्या सातारा दरबारातील सरदाराने गोव्यात बांधलेले एकमेव मंदिर

SCROLL FOR NEXT