Panaji Smart City Dainik Gomantak
गोवा

Panaji Smart City: ‘स्‍मार्ट सिटी’वरून बाबूश-उत्पलमध्ये जुंपली

25 वर्षे कामेच झाली नाहीत : मोन्सेरात; पणजीत नियोजनशून्य कारभार : पर्रीकर

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Smart City: शहरात स्मार्ट सिटी आणि ‘जी-२०’ परिषदेनिमित्त कामे सुरू आहेत. त्यात स्मार्ट सिटीची कामे रेटण्यावर इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास महामंडळाने भर दिला आहे.

एका बाजूला पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात हे गेल्या 25 वर्षांत कामेच झाली नाहीत असे सांगतात, तर दुसऱ्या बाजूला सध्या जी कामे सुरू आहेत, त्यात नियोजनशून्यता दिसते, असे उत्पल पर्रीकर म्हणतात. सध्या स्मार्ट सिटीच्या कामांवरून या दोन्ही नेत्यांमध्ये कलगी तुरा रंगला आहे.

पणजीत स्मार्ट सिटीच्या कामांना सुरुवात झाली ती मागील वर्षी. त्याच दरम्यान सार्वजनिक बांधकाम खात्यालाही जाग आल्याने त्यांनी मलनिस्सारण वाहिनीचे काम सुरू केले आणि जिकडे-तिकडे रस्ते खोदले होते.

छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर संकट

पणजी शहरातील कामे पूर्ण होईपर्यंत जनतेने थोडा संयम बाळगावा. गेली २५ वर्षे ही कामे रखडलेली होती. रोज कोणती ना कोणती समस्या निर्माण होतच आहे. गटारांची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. आम्हाला आमच्या मतदारसंघातील लोकांची काळजी आहे. - बाबूश मोन्सेरात.

लोकांची चिंता न करता कामे सुरू करणे योग्य आहे का? सर्व शहरच खोदल्यामुळे लहान व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. रात्री दोन वाजेपर्यंत कामे केली जातात. त्याविषयी तक्रारी येतात आणि मग पोलिसांना ती कामे बंद करावी लागतात. हे कुठेतरी चुकत आहे.

- उत्पल पर्रीकर.

महापौरही सावध

पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी सर्व जबाबदारी ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या अभियंत्यांवर ढकलली होती. त्यांचे सुपुत्र तथा महापौर रोहित मोन्सेरात यांनीही ‘हात’ वर करत महापालिकेचा त्यात काहीच संबंध नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे उत्पल पर्रीकर यांनी, बाबूश व रोहित यांचे नाव न घेता बाप-लेकाने पणजी खड्ड्यात घातल्याची टीका केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Two Wheeler Ban Porvorim: पर्वरी उड्डाणपुलावर दुचाकींना 'नो एंट्री'! अपघातानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये; 65 किमी वेगमर्यादा, रडार आणि सीसीटीव्हीचीही तयारी

Goa Crime: 5 लाखांची सुपारी, कॅसिनो संचालकावर गोळीबार! मुख्य शूटर उत्तर प्रदेशातून जेरबंद; नेपाळला पळून जाण्याच्या होता तयारीत

Harmanpreet Kaur Record: हरमनप्रीत कौरने रचला इतिहास! मिताली राजचा रेकॉर्ड मोडीत काढत बनली आशियातील यशस्वी कॅप्टन; भारताने 8व्यांदा जिंकली 'आशिया कप ट्रॉफी'

Goa Forward AAP Alliance: भाजप-काँग्रेसला पर्याय म्हणून 'गोवा फर्स्ट' मैदानात! सरदेसाई-केजरीवालांची आघाडी जाहीर; 2027च्या निवडणुकीसाठी नवे राजकीय समीकरण

अलेक्झांडर ज्वेरेव्हने रचला इतिहास! बेन शेल्टनला धूळ चारत जिंकले 'US Open 2026' चे विजेतेपद; बनला नवा चॅम्पियन

SCROLL FOR NEXT