Pradeep Yadav Bail Rejected Dainik Gomantak
गोवा

मित्रासोबत बारमध्ये दारू पिली, नंतर खून केला अन् मोबाईल घेऊन यूपीमध्ये फरार; मित्राच्या हत्येप्रकरणी संशयिताचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला

Pradeep Yadav Bail Rejected चांगल्या ब्रँडचा अँड्रॉइड मोबाईल मिळवण्यासाठी मित्राचा खून केल्याप्रकरणी संशयित प्रदीप यादव याचा जामीन अर्ज दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: चांगल्या ब्रँडचा अँड्रॉइड मोबाईल मिळवण्यासाठी मित्राचा खून केल्याप्रकरणी संशयित प्रदीप यादव याचा जामीन अर्ज दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. मृत अर्जुन शर्मा (२५) आणि संशयित यादव हे उत्तर प्रदेशातील कुशीनगर परिसरातील रहिवासी असून कामानिमित्त गोव्यात राहत होते.

२०२३ मध्ये केपे तालुक्यातील पारोडा येथे ही घटना घडली होती. आरोपपत्रानुसार, महागडा मोबाईल मिळवण्याच्या उद्देशाने यादवने अर्जुनचा खून केला. घटनेनंतर त्याचा मोबाईल घेऊन तो उत्तर प्रदेशात पळून गेला. केपे पोलिसांनी तेथून त्याला अटक केली. सरकारी पक्षाने न्यायालयाला सांगितले की, खुनाच्या काही वेळ आधी अर्जुन व यादव एका बारमध्ये एकत्र दारू पीत होते. संशयिताच्या सांगण्यावरून गुन्ह्यात वापरलेली कुदळ आणि अर्जुनचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.

त्यामुळे त्याचा गुन्ह्याशी प्रथमदर्शनी संबंध दिसून येतो, असा युक्तिवाद करण्यात आला. बचाव पक्षाने यादव तीन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असून १७ पैकी सात साक्षीदारांचीच साक्ष झाल्याने खटला लांबण्याची शक्यता असल्याचे सांगून जामीन मागितला. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य आणि उपलब्ध प्राथमिक पुरावे लक्षात घेऊन न्यायालयाने जामीन नाकारला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'मतदारांना विचारूनच भाजपमध्ये आलो'; निलेश काब्राल यांच्या टीकेला रोहन खंवटे यांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

IND vs AUS: गोव्याच्या 18 वर्षीय व्यंकटचे युवा वनडे पदार्पण दिमाखात; ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या विजयात घेतली कर्णधाराची महत्त्वाची विकेट

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'चा जबर दणका! पाक एअरफोर्सचा एअरबेस अजूनही कोमात; सॅटेलाइट कॅमेऱ्यानं पकडली पाकड्यांची चोरी

CCTV Mandatory in medical: औषध दुकानांवर आता सीसीटीव्हीची नजर! H, H-1 आणि X औषधांच्या विक्रीवर नियंत्रणासाठी केंद्राचा मोठा प्रस्ताव

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावर अपघात, पाणी साचण्याच्या समस्येवर 'आप'चा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT