Fish Farming  Dainik Gomantak
गोवा

Fish Farming : गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन ग्रामीण तरुणांना रोजगाराच्या दृष्टीने आशेचा किरण

मत्स्योद्योग खात्याकडून अर्थसाहाय्‍य

गोमन्तक डिजिटल टीम

धीरज हरमलकर

Fish Farming : गोव्यातील गोड्या पाण्यातील मत्स्यशेती ही ग्रामीण भागातील तरुणांसाठी स्वयंरोजगाराची मोठी संधी आहे. मत्स्योद्योग खाते गोड्या पाण्यातील मत्स्यपालन फार्म योजनेद्वारे आर्थिक सहाय्य प्रदान करत आहे. आपल्या परिसरात आपले गोड्या पाण्यातील मत्स्यपालन फार्म यशस्वीपणे चालविण्यासाठी आवश्यक प्रशिक्षणही खाते देत आहे.

मत्स्याहारी गोवेकरांना मासे अगदी प्रियच. मासे न खाणारे गोव्यात क्वचितच आढळतील. बहुसंख्य लोक गोव्यात दररोज समुद्रातील मासे खातात. परंतु गावांमध्ये पावसाळ्यात लोक तलाव, नद्यांमध्ये गोड्या पाण्यातील मासे पकडण्यासाठी जातात. गोव्यातही गोड्या पाण्यातील माशांची मागणी वाढत आहे. पण आता या गोड्या पाण्यातील माशांची चव चाखण्यासाठी पावसाळ्याची वाट पाहावी लागणार नाही. आता हे मासे आपल्याला वर्षभर मिळू शकतात. हे गोड्या पाण्यातील मत्स्यपालन फार्ममुळे शक्य झाले आहे.

योजनेचा कोणाला मिळेल लाभ ?

मत्स्यपालक, सामान्य व्यक्ती, नोंदणीकृत स्वयं सहाय्य गट, संस्था, संघटना या योजनांचा लाभ घेऊ शकतात. मत्स्यपालक हा गेल्या १५ वर्षांपासून गोव्याचा रहिवासी असावा, असेही त्या म्हणाल्या. याशिवाय या योजनांचा लाभ घेण्यासाठी मत्स्य शेतकऱ्याने अर्जदाराचा संयुक्त फोटो, आधार कार्ड, प्रस्तावित जमिनीचा नमुना एक आणि चौदा, आदेशपत्र आणि मत्स्यबीज, खाद्य आणि उपकरणे, शेत खरेदीचे बिल यासह विहित नमुन्यात अर्ज देणे आवश्यक आहे.

योजनेचे सध्या तीन लाभार्थी

  • गोव्यात तीन लाभार्थी आहेत ज्यांची गावात गोड्या पाण्यातील मत्स्यपालनाचे

    फार्म आहेत.

  • धारबांदोडा येथील उमाकांत बेतोडकर, केरी-सत्तरी येथील नवीदा हबीब आणि साळ, डिचोली येथील अनिता मॅथ्यू अशी लाभार्थ्यांची नावे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dog Attack Viral Video: 6 महिन्यांच्या बाळावर कुत्र्याचा जीवघेणा हल्ला, आत्यानं वाचवला चिमुरडीचा जीव; अंगावर काटा आणणारा थरार व्हायरल!

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ भक्कम स्थितीत! दररोज 84 विमानांची ये-जा, 13 हजार प्रवाशांची हाताळणी; विमानतळाला 137 कोटींचा नफा

Tarun Tejpal: कधी सत्ताकेंद्रांना प्रश्न, आता कारागृहाचे नियम! कोलवाळमध्ये तेजपालचा दिवस कसा जातो? शेजारी लुथरा बंधू आणि अजय गुप्ता

Passport New Rules: पासपोर्टचे नियम अन् फी बदलली, सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री; परदेश प्रवासापूर्वी ही बातमी नक्की वाचा

IND vs AFG: 18 चौकार, 22 षटकार अन् 229 धावा! अभिषेक शर्मा ठरला T20 मालिकेचा 'किंग'; टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडचा करिष्मा

SCROLL FOR NEXT