Power Outage X
गोवा

Shigao: दिवसातून दहावेळा वीज जाते, बिले मात्र दुप्पट; शिगाववासीय नाराज, कमी-उच्च दाबामुळे उपकरणे होताहेत खराब

Goa Electricity Issue: गायब झालेल्या विजेसंदर्भात संबंधित सब स्टेशनमध्ये दूरध्वनी करून विचारल्यास पंटेमळ येथील ३३ केव्ही नादुरुस्त असल्याचे सांगून आपल्यावरील हात झटकून टाकतात.

Sameer Panditrao

फोंडा: कुळे पंचायत क्षेत्रात शिगाव येथे वीज सबस्टेशन असूनसुद्धा दिवसातून कमीतकमी १० वेळा तरी वीज गायब होत असल्याने येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या वीज सबस्टेशनच्या हद्दीत कुळे, शिगाव व मोले पंचायतींचे सर्व गावांत वीजपुरवठा होत असतो. कुळे व मोले येथे वीज दुरुस्तीवर नजर ठेवण्यासाठी कार्यालये आहेत. या ठिकाणी येऊन ग्रामस्थ आपल्या वीजसंदर्भातील तक्रारी दाखल करतात.शिगाव या ठिकाणी सब स्टेशन असल्याने त्यासाठी अनेक वीज कर्मचारी आहेत, पण वीज मात्र वारंवार गायब होत आहे.

गायब झालेल्या विजेसंदर्भात संबंधित सब स्टेशनमध्ये दूरध्वनी करून विचारल्यास पंटेमळ येथील ३३ केव्ही नादुरुस्त असल्याचे सांगून आपल्यावरील हात झटकून टाकतात. पावसाळ्यात वीज सुरळीत मिळावी यासाठी उन्हाळ्यात अनेक वेळा शटडाऊन घेतले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शटडाऊन घेऊन काम करतात त्यावेळी त्यांच्यासोबत कनिष्ठ अभियंता त्या ठिकाणी असणे गरजेचे असते, पण तेव्हा कनिष्ठ अभियंता मात्र कुडचडे कार्यालयात असतो. अशावेळी काम नीट होते की नाही हे कोणी पहावे असा प्रश्नही शिगाववासियांनी केला आहे.

अभियंत्याची कमतरता

या ठिकाणी कनिष्ठ अभियंतासाठी कार्यालय रुम आहे, पण कनिष्ठ अभियंता मात्र कुडचडे येथे मुख्य कार्यालयात राहून काम करीत आहे. त्यांना विजेच्या समस्यांसंदर्भात काही बोलायचे असल्यास कुळेतून २० ते ३० कि.मी अंतर कापून कुडचडे येथील कार्यालयात जावे लागते. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने आठवड्यातून तीन दिवस तरी शिगाव येथील वीज सबस्टेशनमधील कार्यालयात त्याला पाठवावे अशी मागणी होत आहे.

वीज उपकरणे झाली खराब

दिवसातून अनेक वेळा वीज वारंवार जात असल्याने अनेक लोकांच्या घरातील विजेवर चालणारी उपकरणे नादुरुस्त झालेली आहेत. हा भाग ग्रामीण असल्याने लोकांजवळ पुन्हा पुन्हा विजेची उपकरणे घ्यायला पैसे नसतात. वीज वारंवार गायब होत असली तरी बिले मात्र दुप्पट येत आहेत. लोकांच्या अनेक वस्त्तू कमी दाब व उच्च दाब विजेमुळे खराब झाली आहेत.

ट्रान्स्फॉर्मरची मागणी

गावातील प्रत्येक वाड्यावरील जास्ती जास्त घरात घरात एअरकंडिशनर आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात रात्रीच्या वेळेत वीज पुरवठा अगदी मंद असतो.शिगाव हायस्कूलजवळ असलेल्या ट्रान्स्फॉर्मरमधून वानसायवाडा, कॅनलवाडा, तुरीमरड व काऱ्यामळ यांना वीजपुरवठा पुरवित असतो.एवढ्या वाड्यांवर याच ट्रान्स्फॉर्मरमधून वीजपुरवठा होत असल्याने रात्रीच्या वेळी अगदी कमी उजेड घरात पसरतो. तेव्हा संबंधित खात्याने तुरीमरड येथे नवीन ट्रान्‍स्फॉर्मर घालून त्यातून वीज दिल्यास सर्वांना वीजपुरवठा व्यवस्थित होऊ शकतो.या भागातून वरून घातलेली वीज केबल नादुरुस्त आहे. आता अंतर्गत केबल घातलेले आहे पण अजूनपर्यंत वीज दिवसातून दहा वेळा जात असते. संबंधित मंत्रिमहोदयांनी गांभीर्याने लक्ष देऊन हा प्रश्न सोडवावा अशी मागणी शिगाववासीय करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT