hotel death case Dainik Gomantak
गोवा

French Chef: फ्रेंच प्राध्यापकाचा गोव्यातील हॉटेलमध्ये आढळला मृतदेह; फॅमिलीपासून दूर 3 वर्षांपासून एकटेच करत होते वास्तव्य

Chef Death In Hotel: अल्बर्ट हे नागवा येथील कमाक्षी कॉलेज ऑफ कलिनरी आर्ट्समध्ये प्राध्यापक आणि हेड शेफ म्हणून कार्यरत होते.

Akshata Chhatre

वेर्णा: वेर्णा येथील एका हॉटेलमध्ये सोमवारी (१४ जुलै) एका ६४ वर्षीय फ्रेंच नागरिकाच पॅट्रिक अल्बर्ट मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. अल्बर्ट हे नागवा येथील कमाक्षी कॉलेज ऑफ कलिनरी आर्ट्समध्ये प्राध्यापक आणि हेड शेफ म्हणून कार्यरत होते. गेल्या तीन वर्षांपासून ते गोव्यात एकटेच राहत होते.

नेमके काय घडले?

वर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मडगाव येथील पोलीस नियंत्रण कक्षातून त्यांना हॉटेलमधील एक पाहुणा प्रतिसाद देत नसल्याची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता, अल्बर्ट त्यांच्या खोलीतील पलंगावर निपचित पडलेले आढळले. त्यांना तात्काळ मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तिथेच त्यांचा मृत्यू झाल्याची घोषणा करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, अल्बर्ट यांच्या देखभालीसाठी दोन काळजीवाहू होते. सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास काळजीवाहूंना अल्बर्ट प्रतिसाद देत नसल्याचे आढळले आणि त्यांनी इतरांना माहिती दिली. त्यानंतर स्थानिक लोकांनी १०८ रुग्णवाहिका सेवा आणि पोलिसांना बोलावले.

मृत्यूचे कारण अस्पष्ट, पोलीस तपास सुरू

सध्या तरी अल्बर्ट यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. वर्णा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक कॅरी फर्नांडिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अल्बर्ट यांचा मृत्यू नैसर्गिक होता की यामागे अन्य काही कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT