Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Breast Cancer: स्तन कर्करोगावरील लाखो रुपयांचा ‘फेसगो’ डोस गोव्यात मिळणार मोफत

Breast Cancer: आरोग्य सुविधेत गोव्‍याला बनविणार सर्वोत्तम : राणे

दैनिक गोमन्तक

Breast Cancer: मी पेशाने डॉक्टर नसलो तरी देखील माझ्या आयुष्यात घडलेल्या घटनांच्या अनुभवावर आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गोव्याच्या जनतेच्या आरोग्याच्या अनुषंगाने ज्या काही सुविधा देता येतील, त्या देण्यासाठी प्रयत्नरत आहे. आरोग्य सुविधेत गोवा सर्वोत्तम करण्याचा आपला प्रयत्न आहे,असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी केले.

आरोग्य संचालनालय, यूई लाईफ सायन्स, एसबीआय फाऊंडेशन आणि युव्हीकॅन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 30 वर्षांवरील राज्यातील 1``लाख महिलांचे स्तनकर्करोग चाचणीचा टप्पा पूर्ण केल्यामुळे आयोजित विशेष कार्यक्रमात दरबार हॉल, राजभवन येथे ते बोलत होते. यावेळी आरोग्य सचिव कुमार मिश्रा यांच्‍यासह अनेक मान्‍यवर उपस्‍थित होते.

‘फेसगो’ डोस देणार मोफत!

अनेकदा महिला स्तन कर्करोगाकडे दुर्लक्ष करतात. माझ्या कुटुंबात हा प्रसंग घडल्याने त्या वेदना मी जाणतो. त्यामुळे आपल्या आरोग्याबाबत कधीच हलगर्जीपणा करू नका. स्तन कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास लवकर त्यातून बाहेर पडता येते. त्यामुळे येत्या काळात ‘फेसगो’ नामक डोस ज्याची किंमत लाखो रुपयांत आहे, असा डोस गोव्यातील स्तनकर्करोग ग्रस्तांना 4 फेब्रुवारीपासून मोफत देणार असल्याचे आरोग्यमंंत्री विश्‍वजीत राणे यांनी सांगितले.

राणे म्हणाले, गोवा हे एकमेव राज्य आहे जिथे १ लाख महिलांच्या स्तनकर्करोग स्क्रिनिंगचा टप्पा पूर्ण केला आहे. येत्या दीड वर्षात २.५० लाख महिलांचे स्क्रिनिंग करण्याचे उदिष्ट आहे.

विमा योजनेत सुधारणा करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही देशात आरोग्यविषयक अनेक उपक्रम राबवत आहोत. येत्या काळात मोठ्या प्रमाणात हेल्थ रेकॉर्डचे डिजिटलायजेशन करण्याचे कार्य हाती घेतले जाईल. त्यामुळे कोठेही उपचार घेण्यास मदत होईल.

राज्यातील आरोग्य विमा योजनेत सुधारणा करणार असून याबाबत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे, असे राणे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Army Jawan Assaulted: देशरक्षकच असुरक्षित? लष्कराच्या जवानाला टोल नाक्यावर खांबाला बांधून मारहाण, 6 जण अटकेत

Heavy Rain in Goa: राज्याला मुसळधार पावसाचा तडाखा; 100 इंचापेक्षा जास्त पावसाची नोंद

Pune-Sindhudurg Flight: पुण्यातील कोकणवासियांना बाप्पा पावला... गणेश चतुर्थीनिमित्त 'Fly91'च्या उड्डाण संख्येत वाढ, वाचा सविस्तर

Memu Special Train: कोकणातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, 'या' मार्गावर धावणार अनारक्षित मेमू स्पेशल ट्रेन

कारच्या धडकेत एका मुलीसह आठ जण जिवंत जाळले; गुजरातमधील घटना

SCROLL FOR NEXT