Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

Goa Free Electricity: गोवेकरांना दिवाळी भेट! सर्वसामान्यांना मोफत वीज, मंत्री सुदीन ढवळीकर यांची घोषणा

Manish Jadhav

यंदाच्या दिवाळीपूर्वीच गोमंतकीयांना मोठं गिफ्ट मिळालं आहे. राज्याचे वीजमंत्री सुदीन ढवळीकर यांनी एक मोठी घोषणा केली. 300 ते 400 युनीट वीज वापरणाऱ्या घरांना आता मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वीजमंत्री सुदीन ढवळीकर यांनी आज (15 ऑक्टोबर) धर्मापूरमधील एका कार्यक्रमात बोलताना ही घोषणा केली. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही घोषणा केली. तसेच, आपल्या गावात सोलर फार्म उभारण्यासाठी वापरात नसलेल्या जमिनी शोधण्यासाठी आमदारांसह गोमंतकीयांनी पुढे यावे, असे आवाहनही यावेळी वीजमंत्री ढवळीकरांनी केले.

दरम्यान, राज्यसरकार वेळोवेळी गोमंतकीयांसाठी घोषणा करत असते. यापूर्वी, राज्य सरकारने निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा देत निवृत्तीनंतर 50 टक्के पेन्शन देण्याचा निर्णय घेतला होता.

'स्वयंपूर्ण गोवा'

राज्याच्या विकासासाठी ‘डबल इंजिन’ सरकारचे भक्कम सहकार्य मिळत आहे. या सहकार्यामुळेच वीज क्षेत्रात राज्याला स्वयंपूर्ण बनवणे हा सरकारचा संकल्प आहे. 2027 पर्यंत राज्यात 150 मेगा वॅट हरित वीजनिर्मिती करण्याचे स्वप्न आहे, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी यापूर्वी सांगितले होते.

वीज खात्याने 2640 कोटी रुपयांच्या कामांचे नियोजन केले असून 900 कोटी रुपयांची कामे सुरु आहेत. तर ऑक्टोबरनंतर 1600 कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ करण्यात येईल. खात्याने वीज दरवाढ न करता वसुलीद्वारे 20 टक्के महसूल वाढवला आहे, असा दावा वीजमंत्री सुदीन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी पत्रकार परिषद घेवून यापूर्वी केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CM Pramod Sawant: परप्रांतीयांचा मुद्दा तापणार; मुख्यमंत्री सावंतांनी थेटच सांगितलं, 'प्रत्येक क्षेत्रात घुसखोरी'

Automated vacuum Sewer: आधुनिक पद्धतीने सांडपाणी व्यवस्थापन करणारे गोवा ठरले पहिले राज्य!

Sunburn Festival Goa: अमलीपदार्थ, देहव्यापाराला चालना देणारे उत्सव आमच्या इथे नकोच; दक्षिण गोव्यातले नेत्यांचा निर्धार

Baga Crime: गोव्यात पर्यटकांचा धुडगूस! स्थानिकांना मारहाण; संतप्त जमावाचा पोलिसांना घेराव

गोव्यात येऊन 'काहीही' करून चालणार नाही! पर्यटकांनी निसर्ग पाहावा, संस्कृती समजून घ्यावी; संपादकीय

SCROLL FOR NEXT