Priya Yadav Goa Arrest  Dainik Gomantak
गोवा

Cash For Job Scam: प्रिया यादवचे गुन्हे मोजून संपेनात!! डिचोलीमधून १८ लाखांची फसवणूक उघडकीस

Priya Yadav Bicholim Complaint: डिचोलीमधून प्रियाच्या विरोधात २०१७ ते २०२३ च्या दरम्यान १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे

Akshata Chhatre

डिचोली: पैसे घेऊन सरकारी नोकऱ्या देण्याची फसवी आश्वासनं देऊन सामान्य लोकांना लुबाडण्याचे अनेक प्रकार सध्या गोव्याच्या विविध भागांमधून समोर येत आहेत. सरकारी नोकरीच्या आशेने फसल्या गेलेल्या अनेकांनी पोलीस ठाण्यात धाव घ्यायला सुरुवात केलीये आणि यामध्ये सामील असलेल्या प्रिया यादव हिच्या विरोधात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची शृंखला अजून संपण्याचं नाव घेत नाहीये. मंगळवार (दि. १२ नोव्हेंबर) रोजी प्रिया यादवच्या विरोधात डिचोली पोलीस ठाण्यात आणखीन एक तक्रार नोंदवण्यात आली.

डिचोलीचे पोलीस उपधीक्षक जिवबा दळवी यांच्या माहितीनुसार, अशोक सोमनाथ पाणिग्रही (बोर्डे डिचोली) यांनी प्रियाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वर्ष २०१७ ते २०२३ च्या दरम्यान प्रिया आणि अजय यादव यांनी डिचोलीत मालमत्ता खरेदी करणे, कोल्हापूर आणि महाराष्ट्रात दुकानं विकणे आणि मुलाला रेल्वेत नोकरी देण्याची कारणं सांगून फिर्यादयाची जवळपास १८ लाख रुपयांची फसवणूक केली.

प्रिया यादवने तक्रारदाराला वैद्यकीय खर्चाचे कारण सांगून सुद्धा सोन्याचे दागिने देण्यासाठी प्रवृत्त केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.

प्रिया यादव सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि या नवीन गुन्ह्याच्या आरोपाखाली तिच्या नावे डिचोली पोलीसांनी 'भादंसं'च्या ४२० कलमाखाली गुन्हा नोंद केला असल्याने आता तिची कोठडी आणखीन वाढणार आहे. पोलीस अधीक्षक अक्षत कौशल, उपअधीक्षक जिवबा दळवी, निरीक्षक दिनेश गडेकर, उपनिरीक्षक सोनाली हरमलकर यांच्या देखरेखीखाली पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT