Fr Bolmax Pereira Dainik Gomantak
गोवा

Fr Bolmax Pereira यांची जामिनासाठी मडगाव न्यायालयात धाव

शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून झाला होता वाद

गोमंतक ऑनलाईन टीम

Fr Bolmax Pereira: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी चिखली येथील चर्चचे फादर बोलमॅक्स परेरा यांच्याविरोधात वास्को पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

त्यानंतर आज, शनिवारी फादर बोलमॅक्स यांनी जामिनासाठी मडगाव जिल्हा न्यायालयात धाव घेतली. फादर बोलमॅक्स परेरा यांनी मडगाव जिल्हा न्यायालयात जामिन अर्ज सादर केला आहे.

बोलमॅक्स परेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य केल्यावर त्यावरून वाद निर्माण झाला होता. शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरूष आहेत पण ते देव नाहीत. हिंदुंनी त्यांना देव बनवले आहे. असे परेरा म्हटले होते. त्यावरून हिंदुत्ववादी संघटनांनी त्याला आक्षेप घेतला होता.

परेरा यांनी नंतर माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, असे सांगत माफीही मागितली होती. तथापि, आक्रमक हिंदु जमावाच्या मागणीनंतर वास्को पोलिसांनी परेरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut Prices: नारळाचे उत्पादन घटले, पण दर वाढलेले नाहीत! '50-60 रुपयांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका'

Nepal Flood: नदीचं खवळलेलं पाणी, पूल तुटण्याच्या मार्गावर... समोर मृत्यू दिसत असतानाही कुटुंबासाठी धावला 'बाप' Watch Video

Stray Cattle: शिवोलीत भटक्या गुरांचा उपद्रव वाढला; मुख्य रस्त्यावर ठाण, छोटे-मोठे अपघात नित्याचे, वाहनचालक त्रस्त

Goa Cashew: काजूच्या बागा वाढल्या, पण उत्पादन घटले! 7 वर्षांत तब्बल 3,683 टनांची घट; यंदा अवघी 65 टनांची वाढ

Goa Delhi Indigo Flight: मोठा अनर्थ टळला! उड्डाणानंतर इंडिगो विमानाचे इंजिन अचानक फेल; मोपा एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवासी सुरक्षित

SCROLL FOR NEXT