Indian Super League Dainik Gomantak
गोवा

Indian Super League: प्ले-ऑफ फेरीतील दोन जागांसाठी चुरस; स्पर्धेला शनिवारपासून पुन्हा सुरवात

Indian Super League : स्पर्धेतील सामन्यांना आजपासून पुन्हा सुरवात

किशोर पेटकर

Indian Super League : मुंबई सिटी, मोहन बागान, एफसी गोवा व ओडिशा एफसी या चार संघांनी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीतील जागा निश्चित केली, बाकी दोन जागांसाठी चुरस आहे.

दोन आठवड्यांच्या आंतरराष्ट्रीय वेळापत्रकानंतर स्पर्धेला शनिवारपासून (ता. ३०) पुन्हा सुरवात होईल, तेव्हा प्ले-ऑफ फेरीतील बाकी दोन जागांसाठी चुरस असेल.

गुणतक्त्यातील सध्याच्या कामगिरीनुसार केरळा ब्लास्टर्स, पंजाब एफसी, बंगळूर एफसी, जमशेदपूर एफसी, नॉर्थईस्ट युनायटेड हे संघ अनुक्रमे पाचव्या व सहाव्या क्रमांकासाठी प्रयत्नशील आहेत.

स्पर्धेत १९ पैकी १३ सामने गमावलेल्या हैदराबाद संघ प्ले-ऑफ फेरीच्या शर्यतीतून गारद झालेला एकमेव संघ आहे.

शनिवारी बंगळूर येथे बंगळूर एफसी व ओडिशा एफसी यांच्यात, तर जमशेदपूर येथे जमशेदपूर एफसी व केरळा ब्लास्टर्स यांच्यात लढत होईल.

केरळ ब्लास्टर्सचा संघ दुसऱ्या टप्प्यात घसरला. मागील पाच सामन्यांत त्यांनी चार पराभव पत्करले असून फक्त एक विजय नोंदविला आहे.

त्यामुळे इव्हान व्हुकोमानोविच यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला बाकी सर्व सामने महत्त्वाचे आहेत. सध्याच्या परिस्थितीत केरळा ब्लास्टर्सचा प्ले-ऑफ फेरीची चांगली संधी आहे.

शिल्डसाठीही चढाओढ

आयएसएल लीग विनर्स शिल्डसाठीही चुरस आहे. जमशेदपूर एफसीने संघातील खेळाडू निवडीत नियमभंग केल्यामुळे त्यांना पराभूत जाहीर करून मुंबई सिटीला विजयाचे तीन गुण बहाल करण्यात आले.

त्यामुळे माजी विजेत्यांचे सध्या सर्वाधिक ४१ गुण आहेत. त्याखालोखाल मोहन बागानचे ३९, एफसी गोवाचे ३६, तर ओडिशाचे ३५ गुण आहेत. साखळी फेरीत अव्वल ठरणारा संघ शिल्डचा मानकरी ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT