Konkan Railway  Dainik Gomantak
गोवा

Konkan Railways : कोकण रेल्वेच्या चार गाड्या येत्या आठवड्यापासून विजेवर धावणार

कोकण रेल्वेतून होणारा प्रवास आता वेगवान होणार आहे.

सुशांत कुंकळयेकर

Konkan Railways : कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कोकण रेल्वेतून होणारा प्रवास आता वेगवान होणार आहे. येत्या आठवड्यापासून या मार्गावरील चार गाड्या यापुढे विजेवर चालणार आहेत. त्यानंतर हळूहळू या मार्गावरून सर्व गाड्या विजेवर धावणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली.

सध्या पहिल्या टप्प्यात 20 सप्टेंबर पासून त्रिवेंद्रम पासून सुटणारी नेत्रावती एक्स्प्रेस विजेवर चालणार असून परतीची 22 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस वरून सुटणारी नेत्रावती विजेवर धावणार आहे. 22 सप्टेंबर रोजी कोचुवेली पासून सुटणारी कोचूवेली - एलटीटी एक्स्प्रेस ही गाडी विजेवर धावणार असून 23 रोजी मुंबईहून सुटणारी परतीची गाडी विजेवर चालणार आहे. दोन महिन्यांपूर्वी कोंकण रेल्वेच्या पूर्ण मार्गाचे विद्युतीकरण झाले होते.

दरम्यान कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकूर या 741 किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. आता या मार्गावर टप्प्याटप्प्यात विजेवर चालणाऱ्या गाड्या धावू लागणार आहेत. सध्या मुंबई ते रत्नागिरी आणि कारवार ते बंगळुरु या मार्गावर विजेवर चालणाऱ्या रेल्वेच्या गाड्या सुरू झाल्या आहेत.

कोकण रेल्वे (Konkan Railways) मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाला नोव्हेंबर 2015 मध्ये सुरुवात झाली होती. एकूण 6 टप्प्यात हे काम पूर्ण करण्यात आले. रत्नागिरी ते थिवी या शेवटच्या टप्प्याचे काम या मार्च महिन्यात पूर्ण होऊन 28 मार्च रोजी रेल्वे सुरक्षा मंडळाने त्याला हिरवा कंदील दाखवला होता. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही कोकण रेल्वेचे अभिनंदन केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT