Goa Medical College and Hospital Dainik Gomantak
गोवा

मारहाणप्रकरणी गोवा मेडिकल कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांची हकालपट्टी

चौकशी समितीने समीर वेळीपवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी विद्यार्थ्यांना ठरवले दोषी

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन डॉ शिवानंद बांदेकर यांनी बॉईज हॉस्टेलमधील आयुष मंगल, नित्यम चंद्र, ऋषभ मारमत आणि मोहम्मद उवैस या एमबीबीएसच्या तृतीय वर्षाच्या चार विद्यार्थ्यांना समीर वेळीपवर हल्ला केल्याप्रकरणी 3 महिन्यांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. 28 एप्रिल 2022 रोजी ही घटना घडली होती ज्यात बॉईज हॉस्टेलमधील चारही विद्यार्थ्यांनी वेळीपवर हल्ला केला होता. (Four MMBS students rusticated from Boys hostel for assaulting fellow student)

आज जारी केलेल्या आदेशात, डीनने विद्यार्थ्यांना खडसावत सांगितले की, त्यांची बाजू ऐकून आणि प्रकरणातील इतर सर्व पैलू विचारात घेतल्यानंतर, चौकशी समितीने समीर वेळीपवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी विद्यार्थ्यांना एकमताने दोषी ठरवले आहे.

चार सदस्यीय चौकशी समितीच्या शिफारशीच्या आधारे, 3 महिन्यांच्या कालावधीसाठी मुलांच्या वसतिगृहातून तात्काळ हकलण्यात येत आहे, असे आदेशात म्हटले आहे. यापुढे चौकशी समितीच्या शिफारशीच्या आधारे लेखी हमीपत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती करणार नाही अशी लेखी घेण्यात आली आहे. जर हे विद्यार्थी तीन महिन्यांच्या कालावधीत मुलांच्या वसतिगृहाच्या परिसरात आढळले तर रेस्टीकेटचा कालावधी आणखी वाढवला जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT