Chapora Jetty News Dainik Gomantak
गोवा

Chapora News: गोव्यात वादळी लाटांमुळे बोट उलटून बुडाली; मासेमारी करणाऱ्या खलाशांनी वाचवले जीव

गोमन्तक डिजिटल टीम

Chapora Jetty Boat Accident

म्हापसा: शापोरा जेटीपासून दीड किलोमीटरच्या अंतरावर मासेमारी बोट (जीए-०१/२९१५/१५२९) उलटली. या बोटीवरील चौघांना एका मच्छीमारी बोटीवरील कामगारांनी वाचवले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

बोट उलटलेल्या मच्छिमाऱ्यामध्ये बोट मालक चुडगो गावकर (६८), कृष्णा गावकर (४०), दसाराम (२२) व संदीप (२१) या चौघांचा समावेश आहे. ही दुर्घटना आज गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास घडली. शिवोली येथील शापोरा नदीतून दुर्घटनाग्रस्त बोट अरबी समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. मासेमारी करून माघारी येताना वादळी लाटांमुळे ही बोट उलटली आणि काही वेळातच बुडाली. त्यापूर्वी बोटीवरील चारही जणांनी जीव वाचविण्याच्या हेतूने पाण्यात उडी घेतली.

हा प्रकार जवळून जाणाऱ्या बागा जेटीवरील येथील एका मासेमारी बोटमधील खलाशांच्या नजरेस पडला. लगेच या बोटने घटनास्थळी धाव घेतली व चारही जणांना आपल्या बोटमध्ये घेऊन बागा समुद्रकिनारी आणले. त्यातील चुडगो गावकर यांना अस्वस्थ वाटू लागल्याने कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता त्यास उपचार करून घरी पाठवले.

नुकसान भरपाई द्यावी

शापोरा जेटीनजीक समुद्रात बुडालेल्या मच्छीमारी बोट मालकाचे सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाले. सरकारने ही नुकसान भरपाई संबंधित बोट मालकाला द्यावी, जेणेकरून त्यांना आपला व्यवसाय पुन्हा सुरू करता येई, अशी मागणी शोपोरा बोट मालक संघटनेचे अध्यक्ष बलभीम मालवणकर यांनी केली आहे.

१२ लाखांचे नुकसान

ही बुडालेली फायबरची बोट होती. याशिवाय बोटीवरील दोन मोटर व जाळीही बोटसमवेत बुडाली. त्यामुळे अंदाजे १२ लाखांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच शापोरा किनारी पोलिस निरीक्षक गौरीश मळीक, अग्निशमन अधिकारी गणेश गावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: परदेशी पावलं गोव्याच्या दिशेने वळणार; यंदा विदेशी पर्यटकांची संख्या वाढणार

Pitrupakasha 2024: श्राद्ध आणि महालय यात फरक आहे का? सर्वपित्री अमावस्या म्हणजे काय?

Ponda Crime: संसार सोडून 'त्या' दोघी गोव्यात, कारमधून आलेल्या तरुणांनी केलं अपहरण; तपासात उघड झाला चक्रावून टाकणारा घटनाक्रम

Goa Tourism: परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सरकारचं खास प्लॅनिंग; कोविड नंतर आकड्यात झालीये का वाढ?

Goa Monsoon: नको रे बाबा पाऊस! सासष्टीत अतिवृष्टीमुळे भातपिकाची नासाडी; शेतकरी चिंतातुर

SCROLL FOR NEXT