Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: एकाच दिवशी चार मृतदेह सापडल्याने खळबळ! जुने गोवेत दोन, पणजी व आमोणेत प्रत्येकी एक मृत्यू

Four Bodies Found In Goa: जुने गोवे परिसरात दोन, मांडवी नदीत एक व आमोणे - खांडोळा पुलाजवळील पाण्यात एक असे चार मृतदेह सापडले आहेत.

Sameer Amunekar

पणजी: राज्यात विविध ठिकाणी चार मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. जुने गोवे परिसरात दोन, मांडवी नदीत एक व आमोणे - खांडोळा पुलाजवळील पाण्यात एक असे चार मृतदेह सापडले आहेत.

जुने गोवे परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी संशयास्पद स्थितीत दोन मृतदेह सापडल्याने पोलिसांकडून वेगवेगळ्या कोनातून तपास सुरू करण्यात आला आहे. मृत युवकाचे नाव पोलिसांकडून अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले नसले, तरी स्थानिकांच्या दाव्याप्रमाणे गेल्या काही महिन्यांपासून एक युवक याच परिसरातील खाद्यपदार्थ दुकानात काम करत होता.

जुने गोवे पोलिस ठाण्याचे पथक दोन्ही घटनांचा स्वतंत्ररीत्या तपास करत असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होणार आहे. दोन्ही मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडले असून पहिल्या प्रकरणात मृताच्या शरीरावर जखमा दिसत आहेत, तर दुसऱ्या प्रकरणात मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही.

जुने गोवे येथील बिर्याणी कॉर्नरमध्ये मदतनीस म्हणून काम करणाऱ्या मिर्झा सोरेन (२६, मूळ रहिवासी ओडिशा) या तरुणाचा मृतदेह रविवारी आढळून आला. सुरुवातीला मृत्यू संशयास्पद वाटत असला, तरी पोलिसांनी अखेर घातपाताचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. मृत तरुणाचा चुलतभाऊ राजू सोरेन याने पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, मिर्झा गेल्या दोन दिवसांपासून तीव्र मद्यसेवन, काविळ व पोटदुखीच्या आजाराने त्रस्त होता.

या घटनेनंतर तासाभरातच जुने गोवे येथील अन्नपुर्णा बार अँड रेस्टॉरंटजवळील ओढ्यात एक मृतदेह तरंगताना दिसून आला. हे ठिकाण जुने गोवे येथील जुन्या पोलिस स्थानकाच्या अगदी शेजारी आहे. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी त्वरित अग्निशमन दलास दिली. यानंतर दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढला.

मांडवीत अज्ञाताचा मृतदेह

पणजीतील सांता मोनिका जेटीजवळील परिसरात मांडवी नदीत रविवारी संध्याकाळी ३० ते ३५ वर्षांच्या एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळला आहे. मृताची ओळख अजून पटली नाही. पोलिसांना याविषयी माहिती मिळताच मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. दरम्यान, मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे.

अतिमद्यपानामुळे एकाचा मृत्यू

तानाजी गायकवाड (६२, मूळ कोल्हापूर) यांचा मृतदेह जुने गोवे पोलिस स्थानकाजवळील ओढ्यात तरंगताना आढळला. गायकवाड वेल्डर होते आणि सतत मद्यपान करणारे व अनेकदा रस्त्यालगत झोपणारे म्हणून परिसरात ओळखले जात होते. अग्निशमन दल व आपत्कालीन सेवांच्या मदतीने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणातही प्राथमिक तपासात कोणताही घातपात नसल्याचे सांगितले आहे.

प्रवाशांनी पाहिला तरंगणारा मृतदेह

आमोणे - खांडोळा पुलाजवळील पाण्यात एक ४२ ते ५० वर्षे वयाच्या तरुणाचा मृतदेह तरंगताना पुलावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांनी पाहिला. यासंबंधीची माहिती डिचोली पोलिस स्थानकाला दिल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक कृष्णा गावस हे अग्निशमन दलाच्या जवानांसह आमोणे येथे दाखल झाले.

तेथे पाण्यात तरंगणारा मृतदेह बाहेर काढून मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ओळख पटू शकली नाही. मृतदेहाचा पंचनामा करून बांबोळी येथील वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पाठवण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फाळणीपूर्वी पाकिस्तानला गेले, 1981 मध्ये पुन्हा गोव्यात आले; 44 वर्षाच्या संघर्षानंतर मिळाले भारतीय नागरिकत्व

Panajim: सहा दिवस उलटले, मांडवीत बुडालेली बोट काढण्यासाठी अजूनही हालचाली नाही

New IPO: 200 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट; गोव्यातील 'मोलबायो डायगनोस्टीक' कंपनीचा लवकरच येणार आयपीओ

Goa Politics: प्रचंड बहुमत असूनही नाराजीचा सूर वाढतोय, 2027ची निवडणूक 'भाजप'साठी ठरणार कठीण कसोटी

रविंच्या 'फ्री हँड' फॉर्म्युल्यामुळे गुन्हेगार थरथर कापत होते; आज मात्र कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT