Muktidham Cremotorium Dainik Gomantak
गोवा

Ponda : फोंडा मुक्तिधाम नूतनीकरण कामाला प्रारंभ

नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्याकडून सुरूवात, मुक्तिधामात उपलब्ध होणार अद्ययावत सुविधा

दैनिक गोमन्तक डिजिटल

फोंडा पालिका क्षेत्रातील विविध विकासकामे मार्गी लावताना सर्वांना सोबत घेऊनच ही कामे करण्यात येत आहेत. गेला बराच काळ रखडलेल्या फोंड्यातील मुक्तिधाम स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्याची आवश्‍यकता होती.

त्यासाठी फोंडा पालिकेतर्फे कार्यवाही करताना सर्व नगरसेवकांचे तसेच कृषिमंत्री रवी नाईक व इतरांचे सहकार्य मिळाले, त्यामुळेच मुक्तिधामाचे काम मार्गी लागू शकले, असे फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी सांगितले.

फोंड्यातील मुक्तिधाम स्मशानभूमीच्या नूतनीकरणाच्या कामाला आज (रविवारी) प्रारंभ झाला. नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्यासमवेत उपनगराध्यक्ष अर्चना डांगी, नगरसेवक प्रदीप नाईक, शांताराम कोलवेकर, आनंद नाईक, विश्‍वनाथ दळवी, चंद्रकला नाईक तसेच फोंडा पालिकेचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

रितेश नाईक म्हणाले, फोंड्यातील मुक्तिधाम स्मशानभूमीच्या कामासाठी प्राधान्य देण्यात आले आहे.

मास्टरप्लॅनची कार्यवाही!

फोंड्याचा मास्टरप्लॅन तयार होत असून या मास्टरप्लॅनचे सादरीकरण फोंडा पालिकेत करण्यात आले होते, आता या मास्टरप्लॅनमध्ये सूचना, हरकती मागवण्यात येत असून नवीन सर्व सुविधांनी युक्त मास्टरप्लॅन लवकरच दुसऱ्यांदा आपल्याला संबंधित एजन्सीकडून दाखवण्यात येणार आहे, त्यानंतर तो खुला करण्यात येईल व नंतर मास्टरप्लॅनची कार्यवाही होईल, असे रितेश नाईक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT