Former Sports Minister Ramesh Tawadkar convicted in threat case 
गोवा

धमकीप्रकरणी तवडकर दोषी

गोमंतक वृत्तसंस्था

काणकोण: माजी क्रीडामंत्री रमेश तवडकर यांना काणकोण प्रथम सत्र न्यायालयाने धमकी प्रकरणी दोषी ठरवून शिक्षा ठोठावली आहे. 

खोतीगावातील पुनो वेळीप यांनी यासंदर्भात ३ जानेवारी २०१७ रोजी माजी मंत्री तवडकर यांच्या विरोधात काणकोण पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आपल्या मित्रासमवेत मोटारसायकलवरून चावडी येथे येत असताना पाठिमागून येणाऱ्या  पांढऱ्या रंगाच्या कारमध्‍ये बसलेल्या तवडकर यांनी आपला पाठलाग करून थांबण्याचा इशारा केला. मात्र आम्ही थांबत नसल्याचे बघून मोटारसायकलसमोर कार थांबवून मला मारण्याचा प्रयत्न केला व जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार त्यांनी पोलिसांत दाखल केली होती. पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन तक्रार नोंद केली.                                

पोलिस उपनिरीक्षक दामोदर शिरोडकर यांनी या प्रकरणी तपास करून त्यांच्याविरुद्ध ३४१,३५२,५०६(२) कलमांतर्गत तक्रार दाखल करून घेतली. न्यायालयाने या प्रकरणातील ३४१ कलम ग्राह्य धरले नाही. मात्र, उर्वरीत दोन कलमांतर्गत त्यांना दोषी ठरवले. पुनो वेळीप यांच्यावतीने सार्वजनिक अभियोक्ते अनिरूद्ध प्रभू चिमुलकर यांनी खटला 
चालविला.

२०१७ मध्‍ये माजी मंत्री तवडकर यांनी भाजपमधून बाहेर पडत अपक्ष म्‍हणून निवडणूक लढवली होती. मात्र, त्‍यांना त्‍या निवडणुकीत पराभव पत्‍करावा लागला होता. आता भाजपने त्‍यांचे पुनर्वसन करून पुन्हा एकदा संधी दिली आहे. मात्र, न्‍यायालयीन प्रकरणात अडकल्‍याने त्‍यांच्‍यासमोर समस्‍या निर्माण झाली आहे.                                               

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ICU मध्ये असलेल्या मोरोक्कोच्या महिलेवर गोव्यात बलात्कार, सोलापूरच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरला अटक

Goa Pollution Control: नियंत्रण मंडळाचे मोठे पाऊल! किनारी, औद्योगिक भागातील प्रदूषण रोखण्यासाठी होणार तपासणी मोहीम

Gomantak Excellence Awards: संदीप नाडकर्णी यांचा ‘जीवन गौरव’ने सन्मान! ‘गोमन्तक’च्‍या पुरस्कारांचे 15 सप्‍टेंबरला वितरण

Goa Live Updates: राज्यातील खनिज वाहतूकदारांना फिटनेस प्रमाणपत्राबाबत दिलासा

Jatindranath Das: भगतसिंगांसोबत केले 63 दिवस उपोषण, तुरुंगातच सोडले प्राण; क्रांतिकारी 'जतिंद्रनाथ दास' यांचे स्फूर्तिदायक स्मरण

SCROLL FOR NEXT