Agnelo Fernandes Dainik Gomantak
गोवा

Calangute: कळंगुटमध्ये माझ्या हॉटेलमध्येही मागितली खंडणी; माजी आमदार आग्नेलो फर्नांडिस यांचा दावा

डान्सबारसह सर्वकाही विनादिक्कत सुरू; कायदा-सुव्यवस्था नसल्याचे मत

Akshay Nirmale

Calangute: गोव्यातील सुप्रसिद्ध समुद्रकिनारा असलेल्या कळंगुट येथे हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात खंडणीखोरांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, असे सांगत येथील स्थानिक आमदार मायकल लोबो यांनी नुकतीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली होती.

या भेटीत त्यांनी दोषींवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर आता माजी आमदार आग्नेलो फर्नांडिस यांनीही त्यांच्या हॉटेलमध्येदेखील खंडणी मागितली गेली होती, असे म्हटले आहे.

कळंगुटमध्ये हॉटेल व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावले जात आहे, या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे आग्नेलो फर्नांडिस यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, आग असल्याशिवाय धुर येत नाही. अशा प्रकारच्या खंडणीच्या आरोपांकडे दुर्लक्ष झाले होते.

पण खंडणीखोरांनी खुद्द आमदार मायकल लोबो यांच्याच रेस्टॉरंटमध्ये खंडणी मागितल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. हे खंडणीखोर माझ्याही हॉटेलमध्ये आले होते. रात्री दहा पुर्वी हॉटेल बंद करा नाहीतर प्रोटेक्शन मनी द्यावा लागेल, अशी धमकी मला देण्यात आली होती.

खंडणीबाबत पंतप्रधान आणि गृह मंत्र्यांना पाठवलेली गेलेली पत्रे खोटी असू शकतात, पण मायकल लोबो जे बोलताहेत ते खोटे असू शकते का? कळंगुटमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही.

पोलिसांना आणि सिव्हिल ड्रेस वाल्यांनाही हफ्ता पोहचवला जात आहे. त्याच्या जोरावर तिथे सर्वकाही विनादिक्कत सुरू आहे. डान्सबारही सुरू आहेत, असेही फर्नांडिस म्हणाले. या गैरप्रकारांवर तातडीने कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT