Former MGP MLA Lavu Mamledar will join TMC  Dainik Gomantak
गोवा

MGPचे माजी आमदार लवू मामलेदार करणार TMC मध्ये प्रवेश

गोव्यात मगो पक्ष हा प्रायव्हेट प्रॉपर्टी झालेला असून काँग्रेसमध्ये योग्य नेतृत्वाचा अभाव आहे

दैनिक गोमन्तक

पणजी: फोंडा (Ponda) मतदार संघाचे मगो पक्षाचे (MGP) माजी आमदार व मगो पक्षाचे माजी सरचिटणीस लवू मामलेदार (Lavu Mamledar will join TMC) हे तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. गोव्यात मगो पक्ष हा प्रायव्हेट प्रॉपर्टी झालेला असून काँग्रेसमध्ये योग्य नेतृत्वाचा अभाव आहे .तर स्थानिक पक्षांना गोव्यामध्ये स्थान नाही. त्या कारणाने आपण तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

10 सप्टेंबररोजी आपल्याशी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी संपर्क साधल्यानंतर आपण आपल्या समर्थकांची चर्चा केली आहे. त्यानुसार आपण उद्या कोलकाता येथे जाऊन ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहे व त्यानंतर प्रवेश करणार असल्याचे माजी पोलिस अधिकारी असलेले लवू मामलेदार यांनी आज सांगितले .गोव्यातील भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचे सांगून गोव्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याचे यावेळी मामलेदार यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री लुईझीन फालेरो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याचेही मामलेदार यांनी यावेळी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT