Former MGP MLA Lavu Mamledar may join congress Dainik Gomantak
गोवा

माजी आमदार लवू मामलेदार काँग्रेसच्या वाटेवर

पत्रकार परिषदेत पुढील निर्णय घोषित करणार असल्याची माहिती

दैनिक गोमन्तक

पणजी : फोंड्याचे माजी आमदार लवू मामलेदार काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर काही दिवसातच पक्षावर निशाणा साधत त्यांनी तृणमूलला रामराम ठोकला होता. आज मंगळवारी संध्याकाळी लवू मामलेदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. (Former MGP MLA Lavu Mamledar may join congress News Update)

लवू मामलेदार यांनी मगोत असताना निवडणूक लढवली होती. यात दोनवेळा त्यांना हारही पत्करावी लागली होती, तर एकदा मगोच्या तिकीटावर ते निवडूनही आले होते. पक्षांतर्गत वादानंतर त्यांनी भाजपच्या उमेदवारालाही पाठिंबा दिला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी गोव्यात दाखल झालेल्या तृणमूल काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला होता. मात्र मगो-तृणमूल युती झाल्याने लवू मामलेदार (Lavu Mamledar) यांनी तिथूनही काढता पाय घेतला होता.

तृणमूलमधून (TMC) बाहेर पडल्यानंतर त्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नव्हता. मात्र आज पत्रकार परिषद आयोजित करुन आपल्या पुढील वाटचालीची माहिती मामलेदार देणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार लवू मामलेदार काँग्रेसच्या (Congress) वाटेवर आहेत. त्यामुळे निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच नेते आपपल्या जागांसाठी प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. असं असलं तरी मामलेदार यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसच्या अंतर्गत गोटात नाराजीचं वातावरण पसरण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT