'मुख्यमंत्र्यांनी वाढवले पुतण्याच्या एमबीबीएस परीक्षेतील गुण'

भाजपच्या राजवटीत गुणवत्तेला स्थान नाही; या मुख्यमंत्र्यांनी पात्र उमेदवार आणि विद्यार्थ्यांवर अन्याय केलाय
 Vijay Sardesai allegations of CM
Vijay Sardesai allegations of CMDainik gomantak
Published on
Updated on

मडगाव : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या पुतण्याच्या एमबीबीएसच्या पॅथॉलॉजी विषयाचे गुण वाढवण्यासाठी जीएमसीचे कार्यकारी डीनवर दबाव आणल्याचा आरोप करत, या घटनेची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी केली आहे.

सरदेसाई यांनी मंगळवारी मडगाव येथे पत्रकार परिषद घेवून सांगितले की, एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिकत असलेला सावंत यांचा पुतण्या रीमेडियल परीक्षेत पॅथॉलॉजी विषयात केवळ 18.25 गुण मिळवून नापास झाला होता. "उत्तीर्ण होण्यासाठी त्याला 24.5 गुण हवे होते, जे मुख्यमंत्र्यांनी डीनवर दबाव आणून वाढवायला सांगितले." असे सरदेसाई म्हणाले.

 Vijay Sardesai allegations of CM
कुडतरीत काँग्रेसकडून चार उमेदवारांची यादी जाहीर

"कुलगुरूंनी परीक्षेचे सर्व पेपर तात्काळ सील करून चौकशी करावी." असे सरदेसाई म्हणाले. "विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन गूण नोटिस बोर्डवर लावतात, परंतु या प्रकरणात तसे झाले नाही." असे त्यांनी म्हटले. सरदेसाई म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी (CM) सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षेत गुणांची फेरफार केली आणि आता एमबीबीएसच्या परीक्षेतही तेच करत आहेत.

“भाजपच्या (BJP) राजवटीत गुणवत्तेला स्थान नाही. या मुख्यमंत्र्यांनी पात्र उमेदवार आणि विद्यार्थ्यांवर अन्याय केल्याने या प्रकरणी त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले पाहिजे.’’ असे सरदेसाई म्हणाले. "हा एक अतिशय गंभीर मुद्दा आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या (Court) मार्फत चौकशी करावी." असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com