satyapal malik on pulwama Dainik Gomantak
गोवा

Pulwama Surgical Strike: सुरक्षेतील त्रुटींमुळेच पुलवामा हल्ला

गोमन्तक डिजिटल टीम

Pulwama Surgical Strike पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काश्‍मीरकडे दुर्लक्ष झाले होते. येथील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींकडे दुर्लक्ष केल्यानेच पुलवामा हल्ला झाला, असा सनसनाटी आरोप जम्मू-काश्‍मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ‘द वायर’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

मोदींना भ्रष्टाचाराबाबत फारसा तिटकाराही नाही, असाही टोला मलिक यांनी हाणला आहे. दरम्‍यान, गोव्‍याचे माजी राज्‍यपाल राहिलेले मलिक यांनी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍यावर कालच टीका केली होती.

मलिक हे फेब्रुवारी 2019 मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यावेळी जम्मू-काश्‍मीरचे राज्यपाल होते. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर झालेला हा हल्ला म्हणजे ‘सीआरपीएफ’ आणि केंद्रीय गृह मंत्रालय यांची अकार्यक्षमता परिणाम होता, असा गंभीर आरोप त्‍यांनी केला.

दुर्घटनेचा वापर राजकीय फायद्यासाठी

मलिक म्हणाले, पुलवामा हल्ल्यानंतर मोदी यांनी कॉर्बेट उद्यानाबाहेरून माझ्याशी संपर्क साधला, त्यावेळी मी त्यांना त्रुटींची माहिती दिली होती.

मात्र, त्यांनी मला याबाबत शांत बसण्यास सांगितले. नंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही मला हेच सांगितले.

सर्व खापर पाकिस्तानवर फोडण्याचा आणि या घटनेचा राजकीय फायदा उठविण्याचा यामागील उद्देश असल्याचे मला समजून चुकले.

गुप्तचर यंत्रणांचे अपयश

जवानांना हवाई मार्गाने नेण्याची ‘सीआरपीएफ’ने केलेली मागणी केंद्रीय गृह मंत्रालयाने फेटाळली होती. जवानांना नेण्याच्या मार्गावरही पुरेशी तपासणी झाली नव्हती.

पुलवामा हल्ल्यासाठी वापरलेली मोटार 300 किलो स्फोटकांसह पाकिस्तानातून आली होती आणि ती 10 ते 15 दिवस जम्मू-काश्‍मीरमध्ये फिरत होती, तरी गुप्तचर यंत्रणांना समजले नव्हते, असा आरोपही मलिक यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT