Former State President Of Congress Girish Chodankar
Former State President Of Congress Girish Chodankar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: कामत मुख्‍यमंत्री असतानाच काँग्रेसला फटका; गिरीश चोडणकरांचा हल्लाबोल

गोमन्तक डिजिटल टीम

Former State President Of Congress Girish Chodankar: लोकसभा निवडणुकीचा निकाल जवळ येत असतानाच काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या पक्षांनी आक्रमक राजकारण सुरू केले असून मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना सध्‍या टार्गेट केले जात आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर तसेच गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई या दोघांनीही आज कामत यांच्यावर टीकेचा भडिमार केला. कामत मुख्‍यमंत्री असतानाच काँग्रेसला फटका बसला, असा आरोप चोडणकर यांनी केला.

गोवा फॉरवर्डबरोबर युती असतानाही कामत भाजपच्‍या केंद्रीय नेत्‍यांच्‍या संपर्कात होते. याची त्यांनी कबुली देऊन आपली राजकीय पातळी दाखवून दिली आहे, अशी टीका सरदेसाई यांनी केली. सध्‍या कामत हे विदेशात आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्‍याशी संपर्क साधता आला नाही. कामत यांनी हल्‍लीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्‍या मुलाखतीच्‍या पार्श्‍वभूमीवर या आरोपाच्‍या फैऱ्या झडू लागल्‍या आहेत. दाबोळी विमानतळावर आज प्रसार माध्‍यमांशी बोलताना चोडणकर म्हणाले, २००७ ते २०१२ या काळात मुख्‍यमंत्री असताना कामत यांनी काँग्रेस संघटना वाढू दिली नाही. त्‍यांना संघटना आपल्‍याच हाती हवी होती.

पाऊण तासात दिला दगा

मडगावचा नगराध्‍यक्ष निवडण्‍यासाठी माझ्या घरी दिगंबर कामत आणि इतर नगरसेवकांसोबत बैठक सुरू होती. त्‍यावेळी कामत यांनी ‘मी कुठल्‍याही परिस्‍थितीत भाजपसोबत जाणार नाही’, असे आश्‍वासन दिले होते. परंतु ही बैठक संपल्‍यावर केवळ पाऊण तासात ते भाजपवासी झाले. कामत यांचे हे वागणे त्‍यांची पक्षनिष्‍ठा किती तकलादू आहे हे स्‍पष्‍ट होते, असे सरदेसाई म्‍हणाले.

...तर कॉंग्रेस सत्तेवर असती

काँग्रेसच्‍या कुठल्‍याही मुख्‍यमंत्र्यांवर भ्रष्‍टाचारांचे आरोप झाले नाहीत, तेवढे कामत यांच्‍यावर झाले. त्‍यांच्यामुळेच २०१२ मध्‍ये काँग्रेस आमदारांची संख्‍या २२ वरून ९ वर आली. २०१७ मध्‍ये काँग्रेसला सत्ता स्‍थापनेची संधी प्राप्‍त झाली होती. त्‍यावेळी कामत यांनी दुसऱ्या कुणाला मुख्‍यमंत्री व्‍हायला दिले असते तर काँग्रेस सत्तेवर येऊ शकली असती; पण तिथेही त्‍यांचा स्‍वार्थ आडवा आला. काँग्रेस पक्षाशी ते एकनिष्‍ठ नव्‍हते, असेही चोडणकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT