Gopal Naik Joined BJP  Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: 2,500 समर्थकांसह 'हा' काँग्रेस नेता भाजपात दाखल; गळती थांबेना

दिगंबर कामत यांचा मास्टर स्ट्रोक

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात काँग्रेसला लागलेली गळती काही थांबण्याचे नाव घेत नाही. आठ काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला आणखी एक झटका लागला आहे. काँग्रेसचे माजी विभाग प्रमुख गोपाळ नाईक यांनी 2,500 हजार समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मडगाव येथील भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, नुकतेच भाजपमध्ये गेलेले माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानवडे उपस्थित होते. मडगाव येथील कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान झालेल्या या मोठ्या पक्ष प्रवेशामुळे दिगंबर कामत यांच्या मास्टरस्ट्रोकची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे. दरम्यान, काँग्रेसला हा आणखी एख मोठा धक्का मानला जात असून, काँग्रेससमोर पक्षातील गळती थांबवण्याचे आव्हान आहे.

आठ आमदारांनी पक्षांतर केल्यानंतर अवघे तीन आमदार शिल्लक असलेल्या काँग्रेस राज्यात पक्ष पुर्नबांधणीला सुरूवात केली. जुन्या सर्व समित्या बरखास्त केल्या. नव्यानं पक्ष उभारणीसाठी लागलेल्या काँग्रसेला मडगावमध्ये मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे नुकतीच विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी मिळालेले युरी आलेमाव व ज्येष्ठ काँग्रेस नेते कार्लुस फरेरा काय भुमिका घेतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे..

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

SCROLL FOR NEXT