ST Reservation : Dainik Gomantak
गोवा

ST Reservation : एसटी राजकीय आरक्षणाच्‍या आंदोलनात वैयक्‍तिक स्‍वार्थ : दिगंबर कामत

ST Reservation : भगवान बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमात आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

ST Reservation : मडगाव, राजकीय आरक्षण हा जरी अनुसूचित जमातीचा अधिकार असला तरी या प्रश्‍नावर सध्‍या राजकारणच अधिक होत आहे.

सध्‍या जे राजकारण चालू आहे ते पाहिल्‍यास समाजाचे हित साधण्‍यापेक्षा स्‍वत:चा स्‍वार्थ साधणे हेच त्‍याचे मुख्‍य इप्सित दिसते, असे प्रतिपादन मडगावचे आमदार आणि माजी मुख्‍यमंत्री दिगंबर कामत यांनी केले.

बुधवार, १५ रोजी भाजपच्‍या मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा कार्यालयात आयोजित एका विशेष कार्यक्रमात महान आदिवासी नेते भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त गोवा भाजप एसटी मोर्चातर्फे जनजाती गौरव दिन साजरा करण्यात आला. त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

माजी मुख्यमंत्री व मडगावचे आमदार दिगंबर कामत हे प्रमुख पाहुणे म्हणून तर एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर हे अध्यक्षस्थानी होते. मडगावचे नगराध्‍यक्ष दामोदर शिरोडकर हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. जिल्‍हा पंचायत सदस्‍य सुरेश केपेकर, मडगावच्‍या नगरसेविका मिलाग्रीना गोम्‍स, एसटी मोर्चाचे अध्यक्ष प्रभाकर गावकर, उपाध्‍यक्ष अँथनी बार्बोझा व अन्‍य कार्यकर्ते उपस्‍थित होते.

मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्‍वास

भाजप एसटी मोर्चाचे उपाध्यक्ष अँथनी बार्बोझा यांनी गोव्यातील एसटी समुदायाशी संबंधित समस्या सोडवण्याच्या गोवा सरकारच्या भूमिकेबद्दल समाधान व्यक्त केले.

आदिवासी कल्‍याण खाते सांभाळणारे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. २०२७च्या निवडणुकीत आम्हाला आवश्यक असलेले राजकीय आरक्षण देऊन गोव्याच्या एसटी समाजाला ते पूर्ण न्याय देतील, असा विश्‍वास बार्बोझा यांनी व्‍यक्‍त केला.

केंद्रात भाजप सरकारचे नेतृत्व करणारे स्व. अटल बिहारी वाजपेयी यांनी गोव्यातील गावडा, कुणबी आणि वेळीप या तीन समुदायांना अनुसूचित जमाती म्हणून घोषित केले होते.

आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे २०२७ च्या निवडणुकीत गोवा विधानसभेत राजकीय आरक्षण मिळविण्यासाठी एसटी समुदायांचे प्रलंबित स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वात सक्षम व्यक्ती आहेत.

- दिभंबर कामत, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chandra Grahan: 2025 मधलं भारतातलं पहिलं आणि अंतिम चंद्रग्रहण; कधी आणि कुठे दिसेल जाणून घ्या..

Green Cess Goa: धक्कादायक! 178 कोटींचा हरित कर थकीत; जिंदाल, झुआरी, अदानी, वेदान्‍तासह 26 कंपन्‍या थकबाकीदार

Rashi Bhavishya 28 July 2025: खर्च नियंत्रीत ठेवा, आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी ठेवा; कुटुंबात आनंदाचे क्षण येतील

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

SCROLL FOR NEXT