Michael Lobo in Joseph Sequeira Dainik gomantak
गोवा

शेवटी मासा गळाला लागलाच, लोबोंविरोधात भाजपचे ‘सिक्वेरास्‍त्र’

जोसेफ भाजपमध्‍ये दाखल : कळंगुटमधून उमेदवारी देणार

दैनिक गोमन्तक

उत्तर गोव्यातील महत्त्‍वपूर्ण असलेल्‍या कळंगुट मतदारसंघातील विरोधी गट फोडण्यात भाजप यशस्वी झाला आहे. नुकताच भाजपला रामराम करून काँग्रेसमध्‍ये गेलेले माजी मंत्री मायकल लोबो यांना टक्कर देण्यासाठी कळंगुटचे माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांना आपल्‍याकडे खेचण्‍याची भाजपची चाल यशस्‍वी ठरली आहे.

आता त्‍यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. आज येथील भाजपच्या प्रचार कार्यालयात जोसेफ सिक्वेरा यांना भाजपमध्‍ये प्रवेश देण्यात आला. यावेळी प्रदेशाध्‍यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अनेक मान्‍यवर उपस्थित होते.

यापूर्वी सिक्वेरा काँग्रेसमध्ये होते. सिक्वेरा, माजी आमदार आग्नेल फर्नांडिस आणि अँथनी मिनेझिस यांचा भाजपविरोधी गट कार्यरत होता. या तिघांनाही काँग्रेसची उमेदवारी मिळाली नसल्याने काही दिवसांपूर्वी त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अखेर यातील जोसेफ भाजपच्‍या गळाला लागलेच.

शेवटी मासा गळाला लागलाच!

माजी मंत्री मायकल लोबो (Michael Lobo) यांनी भाजपसोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्याविरोधात कुणाला उमेदवारी द्यावी हा पेच भाजपसमोर निर्माण झाला होता. यापूर्वी भाजपने (BJP) पक्षाबाहेर असलेले मात्र पक्षाला मानणारे गुरुदास शिरोडकर यांना पक्षात सामावून घेऊन लोबोंविरोधात निवडणूक लढविण्‍यासाठी करण्यासाठी प्रयत्न केले होते.

मात्र लोबो यांना टक्कर देणारा उमेदवार असावा यासाठी नव्यानेच तृणमूल काँग्रेसमध्ये गेलेले जोसेफ सिक्वेरा यांना फोडण्यात भाजप यशस्वी झाला आहे. त्यांना कळंगुट मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे पक्षाध्यक्ष तानावडे यांनी जाहीर केले.

सध्या काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करणारे नेते संधिसाधू असून, त्यांना जनता कधीच माफ करणार नाही. त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. यापुढे आपण एकत्र काम करुया. मला भाजपने पक्षात प्रवेश दिल्‍याबद्दल आभारी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: कुडचडे पोलिस स्टेशनजवळ झालेल्या अपघातात स्कूटर चालक जखमी

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

SCROLL FOR NEXT