formalin Checking in Goa
formalin Checking in Goa Dainik Gomantak
गोवा

फॉर्मेलिन चाचणीबाबत ग्राहकांमध्ये शंका

दैनिक गोमन्तक

मडगाव : परराज्यातून मडगावात येणाऱ्या मासळीची चेकनाक्यावर तसेच एफडीएच्या प्रयोगशाळेत काटेकोरपणे चाचणी केली जात असल्याचा दावा एफडीए करीत असली तरी ग्राहक या चाचणीबद्दल अजूनही शंका उपस्थित करीत आहेत. ट्रक, रेल्वेतून येणाऱ्या सर्व मासळीची तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच ही चाचणी अधिक पारदर्शकरित्या करावी, अशी ग्राहकांतर्फे करण्यात येत आहे.

सध्या मडगाव होलसेल मासळी मार्केटात ट्रकमधून तसेच रेल्वेतून मासळी आणली जाते. ही मासळी मार्केटात आल्यानंतर रात्री उशिरा एफडीएचे कर्मचारी तिची तपासणी करतात. मात्र ही तपासणी नेमकी कशी करतात, त्याबद्दल कुणालाही माहिती देत नाहीत. मागच्या शुक्रवारी ''गोमन्तक''ने पोळे चेकनाक्यावर जाऊन स्टिंग ऑपरेशन केले असता हीच बाब पुढे आली होती.

मडगावच्या होलसेल मासळी मार्केटात या गोष्टीचा पुन्हा प्रत्यय आला. मडगावातील एका हॉटेल चालकाने प्रयोगशाळेत ही तपासणी कशी होते, ते पाहण्याचा प्रयत्न केला असता तिथल्या तंत्रज्ञानी त्याला बाहेर काढल्याने वाद निर्माण झाला. शेवटी पोलिसांना त्यात मध्यस्थी करावी लागली.

मडगावात रेल्वेतून जी मासळी येते, तेथेही व्यवस्थित चाचणी करत नाहीत, असा आरोप काही व्यापाऱ्यांनी केला. एफडीएच्या संचालक ज्योती सरदेसाई यांनी ''गोमन्तक''ला दिलेल्या माहितीत रेल्वेतून आलेली मासळी नंतर मडगावच्या प्रयोगशाळेत आणून चाचणी केली जाते. मात्र काही प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार ही मासळी बाहेरच्या बाहेर विकली जाते. तिची चाचणी केली जाते की नाही? हे पाहण्याची एफडीएकडे कोणतीही यंत्रणा नसल्याचे सांगितले जाते. पण मडगाव मार्केटात येत असलेल्या प्रत्येक वाहनातील मासळीची तपासणी केली जाते, असे होलसेल मासळी विक्रेते संघटनेचे अध्यक्ष मौलाना इब्राहिम यांनी सांगितले.

सॅम्पल टेस्टिंग सदोष!

सॅम्पल टेस्टिंग पध्दतीची असल्याने ती परिपूर्ण नसल्याचे मत मडगावचे माजी नगराध्यक्ष सावियो कुतीन्हो यांनी स्पष्ट केले. वाहनात जी पुढे खोकी असतात त्यातील मासळीचीच तपासणी केली जाते. वास्तविक मडगाव मार्केटात हे मासे आल्यावर आतवर जी खोकी असतात, ती उघडून त्यातील माशांची तपासणी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT