Forest Fires In India Dainik Gomantak
गोवा

Forest Fire: फक्त गोवाच नव्हे भारतातील 23 राज्यात सुरू आहे आगीचे थैमान; काय आहे कारण?

भारतातील आगीच्या घटनांचे आकडे भयावह आहेत.

Pramod Yadav

Forest Fires In India: देशात गेल्या 12 दिवसांत जंगलांना 42,799 वेळा आग लागली. अद्याप उन्हाळा पूर्णपणे सुरू झाल नसताना, जंगल मात्र जळत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 19,929 अधिक जंगलात आग लागली आहे. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया (एफएसआय) नुसार सध्या 23 राज्यांच्या जंगलात आग लागली आहे.

भारतातील आगीच्या घटनांचे हे आकडे भयावह आहेत. 1 मार्च ते 12 मार्च या कालावधीत जंगलातील आगीत 115 टक्के वाढ झाली आहे. याचे मुख्य कारण यंदा संपूर्ण देशात फेब्रुवारी महिना कोरडा गेला यावेळी केवळ 7.2 मिमी पाऊस झाला आहे.

हवामान खात्याच्या मते, 1901 नंतर फेब्रुवारी हा सहाव्यांदा सर्वात कमी पावसाचा महिना ठरला आहे. फेब्रुवारी महिन्यात मध्य भारतात पावसाची 99 टक्के कमतरता जाणवली. वायव्य भागात 76 टक्के कमी, दक्षिण द्वीपकल्पात 54 टक्के आणि पूर्व आणि उत्तर-पूर्व भागात 35 टक्के कमी पाऊस झाला. फेब्रुवारीचे सरासरी सर्वोच्च तापमान 29.66 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

देशभरात मार्चच्या पहिल्या 13 दिवसांत 77 टक्के पावसाची घट नोंदविण्यात आली आहे. 13 मार्च 2023 च्या दिवशी संपूर्ण देशात 772 मोठ्या जंगलात आग लागली.

दिल्लीसह उत्तर भारतात 17 आणि 18 मार्च रोजी पाऊस पडू शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे. पण पश्चिम किनारी भागात गेल्या काही दिवसांपासून गुजरात, कोकण, गोव्यात कमाल तापमान 38 ते 39 अंश सेल्सिअस आहे.

तसेच, राजस्थान, रायलसीमा, किनारी कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, गंगा पश्चिम बंगाल, तेलंगणा, केरळ, झारखंड आणि विदर्भात पारा 35 ते 37 अंश होता. उत्तर प्रदेश, बिहार आणि दिल्ली राजधानी क्षेत्रात 32 ते 35 दरम्यान तापमान नोंदवले गेले. जम्मू विभागात तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 6-8 अंश सेल्सिअस जास्त होता.

सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड पॉलिसी (CSTEP) ने भारताच्या तापमानाचा अभ्यास केला होता. त्यात गेल्या तीस वर्षांत म्हणजे 1990 ते 2019 या काळात उन्हाळ्यातील सरासरी कमाल तापमानात 0.9 अंश सेल्सिअस आणि हिवाळ्यात 0.5 अंश सेल्सिअसची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यांचा प्रभाव देशातील अनेक राज्यांमध्ये जाणवत आहे.

कोणत्या राज्यात किती आगीच्या घटना?

एफएसआयनुसार, ओडिशामध्ये सर्वाधिक 202 ठिकाणी आगी लागल्या आहेत. मिझोराममध्ये 110, छत्तीसगडमध्ये 61, मेघालयात 59, मणिपूरमध्ये 52, आंध्र प्रदेशात 48, आसाममध्ये 43, तेलंगणात 33, मध्य प्रदेश - महाराष्ट्रात 27-27, नागालँड-झारखंडमध्ये 23-23, कर्नाटकात 20, अरुणाचल प्रदेशात 13, पश्चिम बंगाल-तामिळनाडूमध्ये 8-8, केरळमध्ये 6, बिहारमध्ये 4, त्रिपुरा-उत्तराखंड-उत्तर प्रदेश-गुजरात-सिक्कीममध्ये प्रत्येकी एक

कारण काय आहे?

सर्वाधिक प्रभावित राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, बिहार, पंजाब, राजस्थान, गुजरात आणि पूर्वोत्तर राज्यांचा समावेश आहे. साधारणपणे, दर 50 वर्षांनी अति उष्णतेची परिस्थिती निर्माण होते.

पण सतत होणारे हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ यामुळे आता दर दहा वर्षांनी असा बदल होत आहे. आगीच्या घटनांमध्ये मानवी हस्तक्षेप असल्याचे एक कारण देखील सांगितले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

Telangana Drug Factory: ड्रग्स माफियांचा 12 हजार कोटींचा कट उधळला! तेलंगणात पोलिसांची मोठी कारवाई; 13 आरोपी गजाआड

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

SCROLL FOR NEXT