Vishwajit Rane Meeging on Fire Incidents in Forest  Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane: वणव्यांवर नियंत्रणासाठी राज्य सरकार तयार करणार सर्वसमावेशक प्लॅन

वनमंत्री विश्वजीत राणे यांची माहिती

Akshay Nirmale

Vishwajit Rane: गोव्यात गेल्या काही दिवसांपासून अभयारण्ये, जंगल परिसरात लागलेल्या आगींबाबत आज वनमंत्र्यांच्या उपस्थितती आढावा बैठक झाली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि गृह मंत्रालय तयार करत असलेल्या राष्ट्रीय वन आग प्रतिबंध आणि व्यवस्थापन आराखड्यात गोव्याचा समावेश करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

या बैठकीला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA), गृह मंत्रालय, केंद्र सरकार, NDMA चे सदस्य, MoEFCC, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या अधिकारी उपस्थित होते.

CWLW सौरभ कुमार यांनी गोव्यातील आगीची अद्ययावत स्थिती, आगीचे स्वरूप आणि संभाव्य कारणे याबाबत सादरीकरण केले. यावेळी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा, भारतीय नौदल यासह लाईन विभागांच्या समन्वयाची माहिती देण्यात आली.

या सर्व घटकांकडून होत असलेल्या कृतीकार्यक्रमावरही सादरीकरण करण्यात आले. भारतीय हवाई दल समुदाय, स्वयंसेवक आणि इतरांचे सहकार्य याबाबत माहिती देण्यात आली. दरम्यान, 5 मार्चपासून आत्तापर्यंतच्या काळात एकूण 71 फायर स्पॉट्स विझवण्यात आले आहेत.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य आणि अतिरिक्त सचिवांनी वन विभागाला आगीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राचे मूल्यांकन करून लवकरात लवकर सुधारात्मक उपाययोजना राबविण्याचा सल्ला दिला.

जंगलातील आग रोखण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकार एक व्यापक वन अग्नि व्यवस्थापन योजना तयार करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावर अपघात, पाणी साचण्याच्या समस्येवर 'आप'चा हल्लाबोल

Adam Zampa Record: कांगारुचा नवा 'किंग ऑफ स्पिन'! ॲडम झाम्पा ठरला ऑस्ट्रेलियाचा नंबर 1 स्पिनर; शेन वॉर्नचा मोडला मोठा रेकॉर्ड

Iron Ore Mining Goa: कोडली खाणीला पर्यावरणीय मंजुरीपूर्वी मोठी सुनावणी; 377 हेक्टर क्षेत्रात 35 लाख टन लोहखनिज उत्खननाचा प्रस्ताव

Goa Politics: निंबाळकरांची 'ती' पोस्ट काही तासांत डिलीट; सरदेसाईंवरील टीकेनंतर राजकीय चर्चेला उधाण, 'गोवा फर्स्ट'वर निशाणा

खरी कुजबुज: स्वच्छतेत 'अर्थ' नाही!

SCROLL FOR NEXT