Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane: आगींच्या घटनांबाबत रिस्क घेणार नाही, वनमंत्र्यांनी सांगितला सरकारचा प्लॅन...

आगीच्या घटनांमध्ये वन्यजीव, झाडांचे नुकसान झाले नसल्याचे स्पष्टीकरण

Akshay Nirmale

Vishwajit Rane: गोव्यात गेल्या काही दिवसांत जंगलात लागलेल्या आगींच्या घटनांबाबत अजिबात रिस्क घेणार नाही, असे सांगत राज्याचे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले. या आगींवर नियंत्रणासाठी आणि आग लागू नये यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, या आगीच्या घटनांमध्ये वन्यजीव, वनस्पतींचे नुकसान झालेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वनमंत्री राणे म्हणाले की, काणकोन ते सत्तरी या भागातील आगीच्या घटनांची मी नुकतीच हवाई पाहणी केली आहे. आग विझविण्यासाठी अतिरिक्त पथके नियुक्त करण्यात आली आहेत. यात स्थानिकांनाही सहभागी करून घेतले आहे. याशिवाय केंद्र सरकारही मदत करत आहे.

नौदलाचे आणखी एक हेलिकॉप्टर कर्नाटकातून येणार आहे. फक्त डोंगराच्या माथ्यावर आग कशी लागते हे समजत नाही. आग खाली लागते आणि वर जाते. त्यामुळे याबाबत सविस्तर चौकशी केली जाणार आहे.

राणे म्हणाले, गेल्या काही दिवसांत आगीच्या घटना घडल्या आहेत. वन खात्याचे या घटनांकडे लक्ष आहे. आगीच्या सर्व घटनांमध्ये लक्ष घातले आहे. 700 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. काल रात्रीच मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत बैठकही झाली.

थेट अटकेचे आदेश

राणे म्हणाले, कुणी जाणीवपुर्वक आगी लावल्या की चुकून लागल्या याची माहिती घेतली जात आहे. थेट कारवाईचे आदेश दिले आहेत. अटकेचे आदेश दिले आहेत. जंगलात कुणालाही प्रवेश दिला जात नाही.

मस्ती करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आमच्याकडून काही चुका होत असतील तरी कारवाई संबंधितांवर केली जाईल.

लोकांनाही आवाहन आहे. वणव्याला कारणीभूत ठरेल अशी कोणतीही कृती करू नये. आगीच्या घटना घडल्यानंतरपासून लगेचच वन खाते, नौदलाची मदत घेतली गेली आहे. केंद्र सरकारही मदत करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pitbull Dog Attack: चिंबल येथे पिटबूल कुत्र्याचा हल्ला; 10 वर्षांची लहानगी गंभीर जखमी

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

PM Narendra Modi: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान विष्णूंचे 11वे अवतार!' भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ; सांगितले 'हे' कारण

SCROLL FOR NEXT