Forest Festival Dainik Gomantak
गोवा

Forest Festival : भूगर्भातील जल पातळी वाढणार : रोहन खंवटे

Forest Festival : पर्वरी रायझिंगतर्फे वनमहोत्सव साजरा

गोमन्तक डिजिटल टीम

पर्वरी, वन्यसंपदा मातीची धूप रोखतानाच जलसंवर्धनाचे महत्त्वाचे कार्य करते. भूगर्भातील जल पातळी सांभाळण्यासाठी वनीकरणाची मोठी मदत होणार असून त्यासाठीच पाणी अडवा, पाणी जिरवा संकल्पना राबविण्यात आल्याची माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली.

पर्वरी रायझिंगच्या वनमहोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य कविता नाईक, पेन्ह द फ्रांकचे सरपंच सप्नील चोडणकर, सुकूरच्या सरपंच सोनिया पेडणेकर, साल्वादोर द मुंदचे पंच संदीप साळगांवकर आदी उपस्थित होते.

पर्वरीतील तिन्ही पंचायत क्षेत्रात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पेन्ह द फ्रांक पंचायत क्षेत्रातील कार्यक्रम सायन्स पार्क येथे तर सुकूर पंचायतीच्या वाहन पार्कींग आवारात दुसरा कार्यक्रम झाला. साल्वादोर द मुंद पंचायत क्षेत्रातील कार्यक्रम संजयनगर येथील वेताळ महारूद्र मंदिर परिसरात झाला.

पाण्याची टंचाई होईल कमी

पाणी अडवून आणि मुरवून भूजलाची पातळी वाढेल, ज्यामुळे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य हटेल आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढेल. नियमित पाणी साठवणामुळे उन्हाळ्यात किंवा पावसाच्या अभावाच्या काळात पाण्याची टंचाई कमी होईल. मुबलक पाणी साठ्यामुळे शेतीची उत्पादनक्षमता वाढेल. योग्य प्रकारे पाणी साठवण व मुरवण केल्यामुळे सतत सिंचनाची सोय होईल, असे खंवटे यांनी यावेळी नमूद केले.

रोपवाटीकांचे वाटप

खंवटे यांच्या हस्ते रोपवाटीकांचे वाटप करण्यात आले. झाडे लावा, झाडे जगवा हा उपक्रम यशस्वी व्हावा या हेतूने रोपवाटीकांचे वाटप करण्यात आल्याची माहिती सरपंच सप्नील चोड़णकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: 'भाजप का काँग्रेसविरोधात लढायचंय ठरवा'; भूमिका स्पष्ट करण्याचा माणिकराव ठाकरेंचा 'आप'ला सल्ला

Vaibhav Suryavanshi: LIVE सामन्यात वाद! आऊट दिल्यावर 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी अंपायरवर भडकला; पुढे काय झालं, पाहा VIDEO

Mohammed Siraj: "जा, रिक्षा चालव!", एका अपयशाने 'हिरो' ते 'झीरो'? मोहम्मद सिराजने नेटिझन्सच्या दुटप्पी भूमिकेवर सोडले मौन, म्हणाला...

दोघांमधील भांडण विकोपाला गेले, पत्नीने रागाच्या भरात पतीच्या अंगावर कढईतील उकळते तेल ओतले

Goa News Live: म्हापसा दरोड्यातील आरोपींनी पळवलेली कार पणजी पुलाखाली बेवारस अवस्थेत आढळली

SCROLL FOR NEXT