Rape Case Dainik Gomantak
गोवा

बलात्कारानंतर जबरदस्तीने गर्भपात, आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला बेड्या

एका 15 वर्षीय मुलीवरील बलात्कारप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल मंजुनाथ ऊर्फ उमर कोळी याला महिला पोलिसांनी अटक केली.

दैनिक गोमन्तक

पणजी: अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिच्या गर्भधारणेची माहिती मिळाल्यानंतर जबरदस्तीने गर्भपात केल्याच्या आरोपाखाली एका पोलिस चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

एका 15 वर्षीय मुलीवरील बलात्कारप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल मंजुनाथ ऊर्फ उमर कोळी याला महिला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध गोवा बाल कायदा व पोक्सो (POCSO) कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. (Forced abortion after rape, accused police officer handcuffed)

पणजी (Panjim) प्रथमश्रेणी न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलिस कोठडी बजावली, अशी माहिती महिला पोलिस स्थानकाच्या निरीक्षक सुदिशा नाईक यांनी दिली.

पोलिस (Goa Police) खात्यातील मोटार विभागात चालक असलेल्या मंजुनाथ कोळी याचे एका अल्पवयीन मुलीबरोबर संबंध होते. मुलीच्या वर्तनामध्ये फरक दिसून आल्याने तिच्या पालकांना संशय आला. त्यांनी मुलीशी चर्चा करून सविस्तर माहिती विचारली असता, तिने पोलिस खात्यातील कॉन्स्टेबलसोबत मैत्री असल्याचे सांगितले.

पोलिस कॉन्स्टेबल मंजुनाथ हा विवाहित असून त्याला मुले आहेत. या अल्पवयीन मुलीला तो आमिष दाखवून तिचा गैरफायदा घेत होता. पीडित मुलगी सध्या दहावीची परीक्षा देत आहे. या दोघांची वैद्यकीय तपासणी केली आहे.

पीडित मुलगी होती गरोदर

त्या व्यक्तीने पीडितेला, त्याच्याशी अवैध संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर ती गरोदर राहिली आणि तिच्या गरोदरपणाची माहिती मिळताच आरोपीने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. "जेव्हा तिच्या आईला अवैध संबंध आणि गर्भधारणेबद्दल कळले, तेव्हा तिने महिला पीएसकडे पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार केली," असे सूत्राने सांगितले.

पीडित आणि आरोपीचे कुटुंब एकमेकांना ओळखत नाहीत. मात्र, ते एकाच परिसरात राहतात, असे तक्रारदार महिलेने सांगितले. पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि गोवा चिल्ड्रेन्स ऍक्ट आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे प्रतिबंध या संबंधित कलमांनुसार बलात्कार आणि गर्भपात केल्याबद्दल एफआयआर नोंदवला आहे.शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत त्याच्या निलंबनाची माहिती मिळू शकली नसली तरी, त्याच वेळी चौकशी सुरू असताना विभाग त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करेल, असे सूत्रांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

SCROLL FOR NEXT