Sulabh Toilet Complex Dainik Gomantak
गोवा

सुलभ शौचालयासाठी दुप्पट दर आकारला जातोय? इथे करा तक्रार, गोवा पर्यटन खात्याची हेल्पलाईन

Public Toilets Goa: आवश्यक डागडुजीनंतर वागातोरचे सुलभ शौचालय कार्यान्वित करूः मंत्री खंवटे

Pramod Yadav

वागातोर समुद्र किनारी असलेले सार्वजनिक सुलभ शौचालय आवश्यक त्या डागडुजीअंती प्राधान्याने एका महिन्याच्या आत कार्यान्वित केले जाईल असे आश्वासन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी आज (24 जुलै) गोवा विधानसभेत दिले.

शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. सुलभ शौचालय नादुरूस्त असल्यामुळे पर्यटकांना अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे ते योग्य ती दुरूस्ती करून लवकर कार्यान्वित करण्याची मागणी लोबो यांनी केली होती.

मागील 14 जुलै रोजी या शौचालयाची पाहणी केली असून संबंधित कंत्राटदाराला सांगून काम लवकर पूर्ण करण्याकडे लक्ष देण्याचे अभिवचनही खंवटे यांनी दिले.

पर्यटकांसाठी दामदुप्पट दर आकारले जात असल्याचा आरोप लोबो यांनी केला व वापराविषयीचे दर फलक बाहेर लावण्याची सूचना त्यांनी पर्यटनमंत्र्यांनी केली. ती मागणी पर्यटनमंत्री खंवटे यांनी मान्य केली.

तसेच पर्यटनमंत्री खंवटे यानी सांगितले की, जर कोणी अधिक शुल्क आकारत असल्यास त्याची तक्रार 1364 या मदत वाहिनी क्रमांकावर दिल्यास योग्य कारवाई केली जाईल.

वागातोर किनारी तीन प्रसाधनगृहे असून दोघांची डागडुजी लवकर करून तिसरा गरजेचा आहे की, काय याची शहानिशा करून त्याविषयी निर्णय घेण्याचे आश्वासन खंवटे यांनी सभागृहात दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT